मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी पनवेलमध्ये घेतलेल्या मेळाव्यात सत्ताधारी व विरोधकांवर हल्लाबोल केला. रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी त्यांनी राजकीय पक्षांना जबाबदार धरलं असून मनसे कार्यकर्त्यांना आक्रमक भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी राज्यात विविध ठिकाणी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आक्रमक होत आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात हडपसरमध्ये आलेल्या राज ठाकरेंनी आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

काही वर्षांपूर्वी टोलविरोधात मनसेनं आक्रमक आंदोलन केलं होतं. त्याआधी मुंबईतील मराठी पाट्यांबाबत मनसे आक्रमक झाली होती. यावेळीही खळ्ळखट्याक् पद्धतीने मनसेनं आक्रमक आंदोलन केलं होतं. आता पुन्हा एकदा मनसे कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचं दिसत असताना राज ठाकरेंनी त्याबाबत त्यांची भूमिका मांडली आहे.

Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
lok sabha mp and actress kangana ranaut
Kangana Ranaut : “शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या”; कंगना रनौत यांचं विधान चर्चेत!
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Ladki Bahin Yojana, brothers, Ladki Bahin,
‘बहिणीं’नो, दीड हजार रुपयांसाठी ‘भावां’ना प्रश्न विचारण्याची ताकद गमावू नका…

“खड्डे काही पहिल्यांदा पडलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून हे खड्डे रस्त्यांवर पडत आहेत. मला जनतेचं आश्चर्य वाटतंय. जनता प्रत्येक वेळी त्याच त्याच लोकप्रतिनिधींना निवडून देत आहेत. जोपर्यंत लोकांचा राग मतपेटीत उतरत नाहीत, तोपर्यंत हे खड्डे बुजणार नाहीत. आजपर्यंत मनसेनं अनेक मुद्द्यांवर अनेक आंदोलनं केली. पदरी काय पडलं? जे महाराष्ट्राचं सर्वार्थाने नुकसान करता, त्या लोकप्रतिनिधींना तुम्ही निवडून देता? मला याचंच जास्त आश्चर्य वाटतं”, असं राज ठाकरे म्हणाले.

“सगळे आपापल्या पद्धतीने आंदोलन करतील”

“आमची १६ ठिकाणी आंदोलनं झाली. मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक रस्त्यावर आंदोलनं होतील. सर्व ठिकाणी आंदोलनं चालू आहेत. यातून सरकारचे डोळे उघडतील अशी आशा आहे”, असं ते म्हणाले. ही आंदोलनं खळ्ळखट्याक् पद्धतीनेच होणार का? अशी विचारणा पत्रकारांनी केली असता त्यावर “प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने करतील”, असं राज ठाकरे म्हणाले.

“मी फक्त एवढंच सांगितलंय की…”

दरम्यान, आंदोलन करताना काय काळजी घ्यावी, यावरही कार्यकर्त्यांना निर्देश दिल्याचं राज ठाकरे म्हणाले. “मी सगळ्यांना सांगितलंय की सगळीकडे तोडफोड करायची गरज नसते. लोकांना त्रास होणार नाही एवढं बघा. कारण रस्त्याने अनेक महिला जात असतात, गर्भवती महिला असतात, ज्येष्ठ नागरिक असतात. पण काही ठिकाणी मनसेचे तरुण कार्यकर्ते आक्रमकपणे उतरणार हे स्वाभाविक आहे. त्याला तुम्ही काही करू शकणार नाही”, असंही राज ठाकरे म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? राज ठाकरे यांचा सवाल

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसे आक्रमक झाली आहे. रत्नागिरीच्या पालीतील ठेकेदाराचा जेसीबी मनसे कार्यकर्त्यांनी फोडला आहे. पनवेलमधील राज ठाकरेंच्या मेळाव्यात त्यांना आंदोलनाचं आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केलं. त्यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात सध्या १६ ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे.