Raj Thackeray Speech : “काकांनी डोळे वटारले अन् लगेच…!” सकाळच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा

“आमचा राजू विधानसभेत एकटा होता. माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. नाहीतर सहज माझी निशाणी घेऊन दुसरीकडे बसला असता. एकटाच तर होता. पण असल्या गोष्टी माझ्या सहकाऱ्यांना शिवत नाहीत”, असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचं कौतुक केलं.

Raj Thackeray kalyan Rural
पहिल्याच भाषणात राज ठाकरेंनी अजित पवारांना केलं लक्ष्य

Raj Thackeray Speech in Kalyan Rural Vidhansabha Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा दिवस संपला असून आता कोण कोणाविरोधात लढणार आहे हे चित्र स्पष्ट झालंय. तसंच, दिवाळीची धामधामूही आता आटोपली असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये निवडून आलेल्या एकमेव आमदाराच्या मतदारसंघातून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. काल दिवाळी संपली आणि आजपासून फटाके फुटणार असं म्हणत राज ठाकरेंनी आजची पहिलीच सभा दणाणून सोडली. या पहिल्याच सभेत त्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवारांना लक्ष्य केलं. २०१९ चा महाविकास आघाडीच्या स्थापनेआधीच्या परिस्थितीवर त्यांनी गंमतीशीर भाष्य केलं आहे.

“आमचा राजू विधानसभेत एकटा होता. माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. नाहीतर सहज माझी निशाणी घेऊन दुसरीकडे बसला असता. एकटाच तर होता. पण असल्या गोष्टी माझ्या सहकाऱ्यांना शिवत नाहीत”, असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचं कौतुक केलं.

Raj Thackeray on shivsena and ncp split
Raj Thackeray Speech : शिवसेनेवर कुणाचा अधिकार? राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत मांडली भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवरही केलं भाष्य!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Swakruti Sharma
Swikriti Sharma : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीम शर्मांच्या पत्नीला एकनाथ शिंदेंकडून विधान परिषदेची ऑफर, उमेदवारी घेतली मागे
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा >> “शिवसेना ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी, राष्ट्रवादी हे शरद पवारांचं अपत्य”, पक्षफुटीवरून राज ठाकरेंनी बंडखोरांना केलं लक्ष्य!

काका मला माफ करा

ते पुढे म्हणाले, “२०१९ ला निवडणुका झाल्या. २०१९ निवडणुका संपल्या, निकाल लागला. मग सकाळचा शपथविधी झाला. पंधरा मिनिटांत ते लग्न तुटलं. कारण काकांनी डोळे वटारले. मग लगेच घरी आले. काका मला माफ करा म्हणाले. मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या, त्यांच्याचबरोबर जाऊन बसले. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात निवडणूक लढवली होती. पण नंतर त्यांच्याबरोबर बसले”, असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना शाब्दिक चिमटा काढला.

“अमित शाहांनी सांगितलं होतं की अडीच वर्षांचं मुख्यमंत्री पदाची हमी देतो, असं उद्धव ठाकरे त्यावेळी बोलले होते. पण कुठे झालं हे? चार भिंतीत? मी मागे म्हटलं होतं की तुमच्यासमोर नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील. तेव्हा आक्षेप का नाही घेतलात?” असा सवाल त्यांनी पुन्हा एकदा विचारला.

शिवसेना ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी

“एकनाथ शिंदेंनी नाव आणि निशाणी घेतली. अजित पवारांनी नाव घेतलं, निशाणी घेतली. आता शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे आणि नाही उद्धव ठाकरेंची. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसे हात लावता? तुम्हाला काय ते आमदार फोडाफोडीचं राजकारण करा”, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केलं.

ते पुढे म्हणाले, “माझे कितीही मतभेद असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे शरद पवारांचं अपत्य आहे. ते अजित पवारांचं अपत्य नाही. महाराष्ट्राची वैचारिक किती घसरण व्हावी? पक्ष पळवतात, निशाणीच्या निशाणी पळवतात. माणसं पळवली जातात”, असंही राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray speech in kalyan rural vidhansabha constituency on morning oth ceremony of ajit pawar sgk

First published on: 04-11-2024 at 19:22 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या