Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या दिलखुलास आणि मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखले जातात. तसंच राज ठाकरे हे त्यांच्या खवय्येगिरीसाठीही प्रसिद्धी आहेत. राजकारणात तर ते आहेतच, पण त्यापलिकडचे राज ठाकरे ( Raj Thackeray ) काही मुलाखतींमध्ये उलगडत जातात. विषय खोल या भाडिपाच्या चॅनलला राज ठाकरेंनी अशीच एक मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट नसतं तर माझं काय झालं असतं ? असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत. हा वारसा त्यांना काका बाळासाहेब ठाकरेंकडून मिळाला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

“मी जे. जे. स्कूल ऑफ आर्टला शिकलो कारण आधी तिथे उद्धव गेला होता. कलानगरमध्ये आम्ही सगळे राहात होतो तेव्हा कलेचं अंग होतं. त्या मार्गाने जायचं असेल तर जे. जे. मध्ये जाणं क्रमप्राप्त होतं. तुमच्या आवडीचं काम असेल तर ते काम वाटत नाही. ड्रॉईंग माझ्या आवडीची गोष्ट आहे त्यात शिकायला मिळेल तर चांगलं होईल. या उद्देशाने मी जे. जे. स्कूल ऑफ आर्टकडे वळलो.” असं राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) म्हटलं आहे.

Amit Thackeray Code of Conduct
Shivsena UBT Letter : मनसेविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, दीपोत्सवावरून थेट निवडणूक आयोगाला पत्र; अमित ठाकरे अडचणीत येणार?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
devendra fadnavis and dawood
Nawab Malik : नवाब मलिकांचा भाजपा नेत्यांना इशारा; म्हणाले, “दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांविरोधात…”
Devendra Fadnavis on Raj Thackeray
Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज ठाकरेंना महायुतीत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

Raj Thackeray : “उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे पक्ष फुटले, कारण..”, राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलं?

राजकारण्याच्या घरातला चमचाही चांगला असू शकतो

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मला वाटतं कदाचित कलानगरचे सगळे अप्लाइड आर्ट निवडलं. मला त्याचा राजकीयदृष्ट्याही उपयोग झाला.” त्यावर अमेय कदम आणि श्रीरंग साठ्ये म्हणाले की तुमच्या कार्यक्रमांमध्ये किंवा तुमच्या सभांमध्ये एक डिझाईन दिसतं. अमेय म्हणाला की मी चमचे पाहिले तुमच्या घरातले किती सुंदर आहेत. त्यावर राज ठाकरे ( Raj Thackeray ) चटकन म्हणाले, “राजकारण्याच्या घरातला चमचाही चांगला असू शकतो.”

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट नसतं तर…..

माझ्यावर माझ्या वडिलांचा आणि बाळासाहेबांचा दोघांचाही प्रभाव आहे. माझे वडील म्हणजे सडाफटिंग होते. त्याचा अर्थ पर्वा नसलेला. त्यांचं म्युझिक करिअर या एकाच गोष्टीत पुढे गेले असते तर कुठल्या कुठे पोहचले असते. मराठी, भाषा, इंग्रजी, उर्दू या भाषांवर प्रभुत्व होतं. मार्मिक सांभाळण्यात त्यांचा बराच वेळ गेला. पण कुणी जर सांगायला आलं माझ्या वडिलांना की बाळासाहेबांना सांगा ना मला तिकिट हवंय किंवा हे पद हवंय त्याला माझे वडील सरळ सांगायचे की या घरात येऊ नकोस. माझे वडील ही गोष्ट करायचे याचा बाळासाहेब ठाकरेंनाही आदर होता. माझा भाऊ आहे पण तो लक्ष घालत नाही. मोहम्मद रफी हे मराठीत गायले आहेत ते फक्त श्रीकांत ठाकरेंकडे. अशीही आठवण राज ठाकरेंनी सांगितली. तसंच राज ठाकरे पुढे म्हणाले मला कधी कधी वाटतं की जे. जे. स्कूल ऑफ आर्ट नसतं तर माझं काय झालं असतं? आयटीआय वगैरे करुन प्लंबर किंवा फिटर असंच झालो असतो दुसरं काहीच नाही. असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

माझं क्रिएटिव्हिटीवर प्रेम आहे

माझं कुठल्याही प्रकारच्या क्रिएटिव्हिटीवर प्रचंड प्रेम आहे. कुठलीही असो. मी पक्षाचं नावही नवनिर्माण ठेवलं. नवनिर्माण म्हणजे नवं काहीतरी घडवण्याचा ध्यास. कुठल्याही प्रकारची क्रिएटिव्हिटी मला आकर्षित करते असंही राज ठाकरे या मुलाखतीत म्हणाले.

Story img Loader