मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर नगरमध्ये झालेल्या लाठीमाराचे पडसाद बुधवारी राज्याच्या विविध भागात उमटण्यास सुरुवात झाली. नगरमध्ये बुधवारी सकाळपासून तणावाचे वातावरण आहे. नियोजनानुसार नगर भेटीच्यावेळी राज ठाकरे जिथे जिथे जाणार होते. त्या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर मनसेचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे स्वतः राज ठाकरे खूप संतापले असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. नगरमधील विश्रामगृहावर ते उतरणार होते. मात्र, दगडफेकीच्या आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर ते हॉटेलवर उतरले. सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. सध्या मी काहीही बोलणार नाही, असा निरोप त्यांनी पत्रकारांना पाठविला. दरम्यान, मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेसंदर्भात गुन्हे नोंदविण्याचे काम अद्याप सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंबरनाथमध्ये कडकडीत ‘बंद’
दगडफेकीच्या निषेधार्थ अंबरनाथमध्ये कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यवहार बुधवारी बंद ठेवण्यात आले आहेत. एकीकडे अंबरनाथ महापालिकेत मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये युती असताना बुधवारी सकाळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात एकमेकांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर पुढील अनुचित प्रकार टळला. अंबरनाथ शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बॅनरही फाडण्यात आले आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी शहरातील सर्व शाळा आणि शाळेच्या रिक्षा आणि बसेस सुरू ठेवण्यात आले असल्याचे मनसेच्या शहरातील नेत्यांनी सांगितले. बदलापूरमधील रिक्षा आणि दुकाने बुधवारी सकाळी बंद ठेवण्यात आली.
ठाणे, परभणी, हिंगोलीमध्ये दगडफेक
नगरमधील घटनेची माहिती समजताच रात्री ठाणे आणि परभणीमध्ये अज्ञात व्यक्तींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयांवर दगडफेक केली. हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार विलास गुंडेवार यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली. राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली.
पुण्यात पोस्टर जाळण्याचा प्रयत्न
पुण्यातील टिळक रस्त्यावर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या अजित पवारांचा फोटो असलेल्या पोस्टरवर अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी रात्री उशीरा पेटते बोळे फेकले. हे पोस्टर जाळण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला. या घटनेविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी टिळक रस्त्यावर मोर्चा काढला. राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन दाखवावे, असे खुले आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनी दिले.
दगडफेकीचे अन्य शहरांमध्ये उमटलेले पडसाद
अकोलामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यालय जाळले. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सुरू असलेली एक ऍम्ब्युलन्सही अज्ञात व्यक्तींनी जाळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड जिल्ह्यातील माजलगावात एसटीच्या सात बस जाळण्यात आल्या.

नांदेड औरंगाबाद मार्गावरील एसटीची वाहतूक बंद

लातूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्यालय फोडण्यात आले.

बीड जिल्ह्यातील माजलगावात एसटीच्या सात बस जाळण्यात आल्या.

नांदेड औरंगाबाद मार्गावरील एसटीची वाहतूक बंद

लातूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्यालय फोडण्यात आले.