अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाने नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या मुलाखतीदरम्यान, त्यांना तुम्ही नेमकं कुणाल घाबरता? असा प्रश्न विचारण्यात आला, या प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरे यांनी त्यांच्या लग्नाच्या पूर्वीचा एक किस्सा सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – मनसेचं महायुतीशी बिनसलं; विधान परिषदेला पाठिंबा नाही, संदीप देशपांडेंकडून भूमिका स्पष्ट

राज ठाकरे नेमकं काय सांगितलं?

लग्नाच्या आधी एका ३१ डिसेंबरला मी आणि शर्मिला, आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलो होतो. तेव्हा शर्मिला आणि माझ्या प्रेम संबंधांबाबत माझ्या सासऱ्यांना म्हणजे मोहन वाघ यांना माहिती नव्हतं. रात्री अडीच तीनच्या सुमारास मी शर्मिला यांना त्यांच्या घरी सोडायला गेलो. तेव्हा फाटकाजवळ कुणीतरी फिरताना दिसलं, तेव्हा तिने मला तिथे बाबा आहेत, असं सांगितले. ती ३१ डिसेंबरची पहाट होती. त्यावर मी तिला सांगितलं की तिथे बाबा नाही तर वॉचमन आहेत, पण ते शर्मिला यांचे बाबा होतो, तेव्हा घाबरून तिथून पळ काढला, हा आयुष्यातला एकमेव प्रसंक होता, जेव्हा मी पळून गेलो होतो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

हेही वाचा – “राज्यपालही म्हणत असतील, माझ्या भाषणात काय लिहिलंय हे”, जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, …

पुढे बोलताना त्यांनी भारतातील राजकीय व्यवस्थेवरही भाष्य केलं. आपण भारतात लोकशाही आहे, असं कितीही म्हटलं तरी भारतात लोकशाही नाही. अमेरिकते ती लोकशाही आहे. त्याचं कारण येथील माणसं सुज्ञ आहे. जिथली जनता सुज्ञ असते, तिथे लोकशाही नांदते. भारतात ज्या पद्धतीने निवडणुका चालतात, ज्या प्रकारे भ्रष्टाचार होतो, ते चुकीचं आहे. भारत हा उत्तम देश आहे, पण इथल्या काही व्यवस्था अशा आहेत, ज्याचा मला राग येतो आणि मी तो राग व्यक्त करतो, असे राज ठाकरे म्हणाले.