राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अर्थातच याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेही अपवाद नाहीत. ते त्यांच्या सभांमधून विरोधकांवर हल्लोबोल करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे राजकारणाबरोबर राज ठाकरेंच्या बाहेरील जीवनाची तुफान चर्चा सुरू आहे. खरं तर राज ठाकरे यांनी कर्लीटेल्स या युट्यूब चॅनेलला नुकताच मुलाखत दिली. यात त्यांनी अनेक आठणवींना उजाळा दिला आहे. तसेच स्वित्झर्लंड मधील एक भन्नाट किस्साही सांगितला.

राज ठाकरे यांना या मुलाखतीत, तुम्हाला बाहेर फिरायला आवडतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले, नक्कीच मला फिरायला आवडतं. “मी देशातही बऱ्याच ठिकाणी फिरतो, अनेकदा परदेशातही जाणं होतं. कारण तिथे एक शांतता असते. लोक तुमच्या बाजुला गराडा घालत नाहीत”. यावरच आजकाल परदेशातही भारतीयांची संख्या वाढली आहे, तर ते तुम्हाला ओळखत नाही का? असा प्रतिप्रश्न त्यांना करण्यात आला.

What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackray?
Devendra Fadnavis : “चंद्रपूरचे आपण सगळेच वाली! कुणीही सुग्रीव नाही, मी कुणासारखा जोक…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला?
Aditya Thackeray meets Devendra Fadnavis for the third time in a month Mumbai news
आदित्य ठाकरे महिनाभरात तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

हेही वाचा – Uddhav Thackeray : “राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “ज्यावेळी मी परदेशात जातो, तेव्हा माझी वेशभूषा बदलेली असते, दाढी वाढलेली असते, जॅकेट आणि टोपी घातलेली असते, त्यामुळे सहसा लोक ओळखत नाही. पण एकदा मी स्वित्झर्लंडला गेलो होतो. तिथे एका ठिकाणी पायऱ्यावरून उतरत असताना मला समोर वडापावचं हॉटेल दिसलं. मी तिथे गेलो, आतामध्ये मी चहा पित असताना एक व्यक्ती माझ्याजवळ आली, त्याने मला विचारलं की राज ठाकरे ना? मी होत म्हटलं, तेवढ्यात तो जोरात ओरडला, ‘ए आजी बघ तुला बोललो ना राज ठाकरे आहेत’. त्याने असं ओरडताच, सगळी लोक माझ्याकडे बघायला लागली.”

हेही वाचा – “…तेव्हा मी राज ठाकरेंच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले”, अमित ठाकरेंनी सांगितला भावनिक प्रसंग!

पुढे राज ठाकरे म्हणाले, “ती व्यक्ती ओरडून थांबली नाही, त्याने बाहेर जाऊन तिथल्या सगळ्या मराठी लोकांना ओरडून सांगितलं की राज ठाकरे आले आहेत, तेही खरे..त्याने खरं राज ठाकरे म्हटल्यावर सगळ्यांनाच हसू आलं, मुळात बाहेर देशात गेल्यावर लोक ओळखतात, पण त्रात देत नाहीत”, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

Story img Loader