राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून शाब्दिकदृष्ट्या जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, त्याचवेळी बुधवारी विधानभवनात दोन्ही बाजूंमध्ये प्रत्यक्षच जुंपल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये आधी बाचाबाची झाली. त्यानंतर हा प्रकार वाढला आणि दोन्ही बाजूचे आमदार एकमेकांना भिडले. हा प्रकार विकोपाला जात असतानाच तिथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येत विरोधी पक्षाच्या सदस्यांना तिथून जायला सांगितलं. या घटनाक्रमावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना शर्मिला ठाकरे यांनी त्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

एकीकडे राज ठाकरेंनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असताना शर्मिला ठाकरे यांनी देखील त्यावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी याविषयी बोलताना “महाराष्ट्रात असा प्रकार याआधी कधीही घडला नव्हता, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”, असं विधान केलं आहे. यासंदर्भात बोलताना शर्मिला ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना खोचक सल्ला दिला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

“…म्हणजे अजून चांगली फ्रीस्टाईल होईल”

एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना विधानभवनात झालेल्या राड्याविषयी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “मी त्या सगळ्या पक्षांना आवाहन करेन की पुढच्या वेळेपासून चांगल्या लोकांना उमेदवारी देण्यापेक्षा आपले पहेलवान, ज्युडो, कराटेवाल्यंनाच आमदारकी द्या. म्हणजे अजून चांगली फ्रीस्टाईल होईल”, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

“..याचा अर्थ आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला ते घाबरतात”, शिवसेना नेत्याचं शिंदे गटाला प्रत्युत्तर!

“..पण या लोकांना त्याची काही पडलेलीच नाही”

“ही खूप लज्जास्पद बाब आहे. आपल्याकडे काहीही नाही. महाराष्ट्रातले रस्ते वाईट आहेत. पाण्याचे प्रश्न आहेत. पाऊस चालू झाल्यापासून गटारं वाहात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. कुठेही काहीही नीट नाहीये. पण या लोकांना त्याची काही पडलेलीच नाहीये”, असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूंच्या वर्तनावर टीका केली आहे.

Story img Loader