महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आज १३ व १४ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गात उपस्थित राहणार आहेत. ते आंगणेवाडी श्री देवी भराडी मातेच्या दर्शनास उपस्थित राहणार आहेत, असे सांगण्यात आले. कोल्हापूर येथून राज ठाकरे सिंधुदुर्गात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कुडाळ या ठिकाणी उद्या १३ फेब्रुवारी रोजी त्यांची बैठक होईल. या वेळी ते कार्यकर्त्यांना संबोधतील, असे सांगण्यात आले. आंगणेवाडी येथे १४ फेब्रुवारी रोजी श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी जाणार आहेत. देवीच्या दर्शनानंतर ते कणकवलीत मुक्काम करतील, असे सांगण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मनसेत प्रवेश करणाऱ्यांना प्रवेश देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र प्रवेश करणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली.

Story img Loader