Raj Uddhav Meet : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघंही आज एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? या चर्चा कायमच सुरु असतात. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवा पक्ष स्थापन केल्यापासून या चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान २०१९ मध्ये जेव्हा विधानसभा निवडणूक आली होती तेव्हा राज ठाकरे हे महाविकास आघाडीबरोबर होते. मात्र २०२२ नंतर राज ठाकरे महायुतीबरोबर गेले. आता आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं. याबाबत आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुठे भेटले?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एका लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेले दिसले. या दोघांमध्ये चर्चाही झाली. ती काय होती त्याचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र आता हे दोन नेते एकत्र आल्याने महापालिका निवडणुकीच्या आधी काही सूत्रं बदलतील का या चर्चांना मुंबईतल्या राजकीय वर्तुळात हे दोन बंंधू आणि राजकीय नेते एकत्र येतील अशा चर्चां सुरु झाल्या आहेत. मुंबईतल्या दादर या ठिकाणी असलेल्या राजे शिवाजी महाविद्यालयात लग्नाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी हे दोन्ही नेते सहकुटुंब पोहचल्याचं पाहण्यास मिळालं. राजकीयदृष्ट्या एकमेकांमध्ये शत्रुत्व सुरु असलेले हे दोन नेते एकत्र आल्याने साहजिकच राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

हे पण वाचा- Video Title: ठाकरे बंधू अनेक वर्षांनी एकत्र! भाच्याच्या लग्नासाठी राज- उद्धव एकाच मंडपात

काय म्हणाले संजय शिरसाट?

मला मंत्रिपद मिळाल्याचा आनंद आहे. एकनाथ शिंदेंची प्रतिमा कॉमन मॅन अशी आहे त्यानुसारच आम्हा सर्वाचं काम करण्याचं ध्येय आहे. मला सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या खात्यात अनेक आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आता आमचे दौरेही सुरु होतील. सोमवारी उदय सामंत आणि मी बीड येथील मस्साजोग या ठिकाणी जाणार आहोत. तसंच परभणीचा दौराही आम्ही करणार आहोत. मराठवाड्यात ज्या घटना घडल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही पोहचून कुटुंबियांची भेट घेणार आहोत. वाढत्या गुन्हेगारीला आळा कसा बसेल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत कणखर भूमिका घेतली आहे असं संजय शिरसाट म्हणाले. यानंतर त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे भेटीवर भाष्य केलं.

राज आणि उद्धव ठाकरे भेटीवर काय म्हणाले संजय शिरसाट?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची लग्नात भेट झाली म्हणून राजकीय वातावरण तापण्याचं काही कारण नाही. जर तसं काही करायचं असतं तर राज ठाकरेंनी विधानसभेच्या वेळी केलं असतं. राज ठाकरेंनी अनेकदा टाळी द्यायचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरेंनी हात कायमच मागे घेतला. मला वाटत नाही की हे दोन बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील. आत्ता तरी ही स्थिती नाही की हे दोघंही एकत्र येतील अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj uddhav meet in mumbai eknath shinde shivsena leader gave the first reaction on it scj