आर्णी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकत्रे राजन भागवत यांनी काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजल्या जात आहे. विशेष म्हणजे जवळा-लोणी मतदारसंघात त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी सुध्दा देऊ करण्यात आली आहे.
प्रताप राठोड यांच्या निधनानंतर २९ जूनला जवळा-लोणी सर्कलमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली असून त्यांच्या उमेदवारीने आता तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. प्रताप राठोड हे काँग्रेसचे जिल्हा परिषदमध्ये विरोधी पक्ष नेते होते. मात्र. त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी मागील निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांना पराभूत केले होते. आता या पोटनिवडणुकीत राजकीय समीकरण बदलले आहे.
काँग्रेसची उमेदवारी प्रताप राठोड यांचे कनिष्ठ बंधु अजित राठोड यांना निश्चित झाली असून ही उमेदवारी सहानुभुतीवर अवलंबून असून याच पक्षाचे माधव राठोड मात्र कांॅग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्याने बंडखोरीच्या मार्गावर आहे. माधव राठोड यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी आपण ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केल्याने काँग्रेसला हे अडचणीचे जाणार आहे. काँग्रेसकडून अजित राठोड, शिवसेनेकडून प्रवीण िशदे, राष्ट्रवादीकडून राजन भागवत, अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत असून सध्या एकूण सात उमेदवार िरगणात असले तरी माघार घेण्याची शेवटची तारीख २१ जून असून काँग्रेससाठी ‘अच्छे दिन नसल्याचे’ चित्र दिसत असले तरी राष्ट्रवादीचे आमदार ख्वाजाबेग व मंत्री शिवाजीराव मोघे, तसेच जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे मंत्री मनोहर नाईक यांची भूमिका शेवटच्या टप्यात महत्वाची ठरणार आहे.

Story img Loader