राजापूर विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर व लांजा या दोन तालुक्यांचा व संगमेश्वर तालुक्यातील कोंडगांव महसूल मंडळाचा समावेश होतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन प्रभाकर साळवी हे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत राजन साळवी हे सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत साळवी यांनी काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा ११ हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांचा पराभव केला होता. राजन साळवी यांना ६५४३३ मते मिळाली, तर अविनाश लाड यांना ५३५५७ मते मिळाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते अविनाश लाड यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. सध्या शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे राजापूरच्या जागेसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेत वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजन साळवी यांच्यावर आरोप करुन राजापूरची जागा काँग्रेसलाच मिळावी अशी भूमिका घेतली आहे. परंतु, राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी हे ठाकरेंच्या शिवसेनेत असल्याने ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Kankavli Assembly Constituency: नितेश राणेंना संदेश पारकर रोखणार का ?
महायुतीत राजापूरची जागा कोणाला मिळणार?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदारसंघात साळवी यांच्या विरोधात उमेदवार देण्याचे आव्हान महायुतीतील भाजप व शिंदेंच्या शिवसेनेसमोर असणार आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघाची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत राजापूरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर लांजा तालुक्यातील भांबेडमधील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राजापूर विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. किरण सामंत हे राजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे संभाव्य उमेदवार असू शकतात.
अखेर शिवसेना विरुद्ध शिवसेना
राजापूर विधानसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या मतभेदांवर अखेर पडदा पडत हा मतदारसंघ अखेर शिवसेना ठाकरे गटाकडेच गेला आहे. डॉ राजन साळवी हे या मतदारसंघातून चौथ्यांदा आपलं नशीब आजमवणार आहेत. तर त्यांचा संभाव्य विजयाचा चौकार रोखण्यासाठी शिवसेनेने किरण सामंत हे मैदानात उतरले आहेत. भाजपा की शिंदेची शिवसेना या चर्चेला पुर्णविराम मिळत हा मतदारसंघ शिंदे शिवसेनेकडे गेला. मोठे शक्ती प्रदर्शन करत शिंदे गटाचे उमेदवार आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेव्हा राज्यातील अनेक मतदारसंघातील लढतीप्रमाणे राजापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेना अशी लढत बघायला मिळणार आहे.