राजापूर : राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशा झालेल्या लढतीमध्ये तीन टर्म आमदार राहीलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार राजन साळवी यांचा महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी तब्बल १९ हजार ६८०  मताधिक्क्याने पराभव केला.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून  सामंत यांनी घेतलेले मताधिक्क्य शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवले. प्रत्येक फेरीप्रमाणे वाढत जाणार्‍या त्यांच्या मताधिक्क्याने कार्यकर्त्यांचा विजयाचा जल्लोष अधिकच वाढवित होता. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीसोबत ढोल ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा करणार्‍या शिवसैनिकांनी विजयी झालेले किरण सामंत मतमोजणी कक्षातून बाहेर येताच त्यांना उचलून घेत विजयाचा एकच जल्लोष केला.

Delhi assembly elections 2025
Delhi assembly elections 2025: केजरीवाल, सिसोदिया, आतिशींवर पराभवाची टांगती तलवार?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार? (फोटो सौजन्य)
Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Budget 2025 Bihar National Institute of Food Technology
निवडणूक वर्षात बिहारवर पुन्हा खैरात
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?
भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत फेसबुकवरील जाहिरातींवर किती रुपये खर्च केले? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत फेसबुकवरील जाहिरातींवर किती रुपये खर्च केले?

अपक्ष उमेदवारीमुळे चुरशीच्या ठरलेल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी  डॉ. जॅसमिन यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी झाली. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीमध्ये  सामंत यांनी ८३१ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर पाचव्या फेरीअखेर  सामंत यांनी ६ हजार १४ मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर प्रत्येक फेरीमागे त्यांचे मताधिक्क्य वाढतच चालल्याचे चित्र पाहता  शिवसैनिकांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. तर, शिवसेना (ठाकरे गट ) आणि महाविकास आघाडीच्या गोटामध्ये भयाण शांतता पसरली होती. अशातच  सामंत नवव्या फेरीतच दहा हजाराहून अधिक मताधिक्क्य मिळवित विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यानंतर, सलग सतराव्या फेरीपर्यंत सामंत यांनी आघाडी घेतलेली असताना सतराव्या फेरीत मात्र, साळवी यांना अवघ्या ६९ मतांची आणि एकविसाव्या फेरीत ६८३ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतरच्या पुढील फेर्‍यांमध्ये  सामंत यांचे वाढणारे मताधिक्क्य शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहीले. वाढणारे मताधिक्क्य पाहून शिवसैनिकांचा विजयाचा जल्लोष प्रत्येक फेरीनुसार वाढतच चालला. शेवटी  सामंत यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत आणि ढोल ताशांचा गजरासह फटाक्यांची आतषबाजी करीत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर, विखारेगोठणे येथून सजविलेल्या गाडीतून राजापूर शहरापर्यंत शिवसैनिकांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करीत  सामंत यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, अपक्ष उमेदवारांमुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, त्याबाबतचा सार्‍यांचा अंदाज फोल ठरला.

हेही वाचा >>> Raj Thackeray : राज ठाकरेंची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अविश्वसनीय..”

दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीमध्ये पोष्टल मतदानामध्ये राजन साळवी यांना ७४८ तर, किरण सामंत यांना ६९७ मते मिळाली. त्यानंतर ईव्हीएम मशिनमधील मतमोजणीला सुरूवात झाली. अंतिम निकालाअंती महायुतीचे किरण सामंत यांना ८० हजार २५६ मते, महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना ६० हजार ५७९ मते, अपक्ष उमेदवार अविनाश लाड ७ हजार ९४५ मते, संदीप जाधव १ हजार ६५ मते, अमृत तांबडे १ हजार २०९ मते, यशवंत हर्याण यांना २८६ मते, राजेंद्र साळवी यांना १ हजार ७४ मते, संजय यादवराव यांना ३७२ मते मिळाली. नोटाला १ हजार ८३० मतदारांनी पसंती दिली. 

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेसह महायुतीला साथ देत  आपणाला निवडून दिल्याबद्दल सार्‍यांना मनःपूर्वक धन्यवाद. आगामी काळामध्ये मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करीत मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून दाखविलेला विश्‍वास निश्‍चितच सार्थ ठरवू.- किरण सामंत, आमदार

Story img Loader