रत्नागिरी : महाविकास आघाडी विरोधात बंडखोरी करुन अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेले कॉंग्रेसचे अविनाश लाड यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. राजापूर लांजा विधानसभेसाठी अविनाश लाड यांनी केलेली बंडखोरी आता त्यांना चांगलीच भोवली आहे. लाड यांची पक्षांकडून हकालपट्टी झाल्याने जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाकडून अविनाश लाड इच्छुक होते. मात्र कॉंग्रेसच्या या पारंपरिक मतदारसंघातून सलग दोनवेळा विद्यमान आमदार राजन साळवी निवडणून आले होते. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. मात्र कॉंग्रेसच्या या मतदारसंघातून पुन्हा कॉंग्रेसला विधानसभा निवडणुकीसाठी जागा मिळावी अशी अपेक्षा येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ पुन्हा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आला. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले. यात अविनाश लाड यांनी या निर्णयाविरोधात जाऊन कॉंग्रेस पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. याबरोबर त्यांनी अपक्ष देखील उमेदवारी अर्ज दाखल करुन ठेवला होता. अर्ज छानणीमध्ये कॉंग्रेस पक्षाचा एबी अर्ज नसल्याने अविनाश लाड यांचा एक उमेदवारी अर्ज बाद झाला होता. मात्र अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत त्यांनी आपला अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यांची ही बंडखोरी आता त्यांच्या अंगलट आली आहे.

हेही वाचा – Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान

हेही वाचा – Uddhav Thackeray : “…तर मविआचे कार्यकर्ते फडणवीस, अजित पवारांच्या बॅगा तपासतील”, निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगेची तपासणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा

कॉंग्रेसकडून आता लाड यांच्यावर सहा वर्षांकरिता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून पक्षानं बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.

Story img Loader