सांगली : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, प्राचार्य डॉ. डी. डी. चौगुले व योगेश राजहंस यांना यंदाचे कर्मवीर पुरस्कार जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष रावसाहेब पाटील व विश्वस्त मंडळाने गुरुवारी पत्रकार बैठकीत केली. दि. २२ सप्टेंबर रोजी पद्यभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार आहे.कर्मवीर नागरी पतसंस्था व कर्मवीर विश्वस्त संस्था यांच्यावतीने कृषी भूषण, विद्याभूषण आणि उद्योगभूषण पुरस्कार देण्यात येतात. यंदाचे हे १७ वे वर्ष आहे. ५१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या निमित्ताने जिल्ह्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना डॉ. काकोडकर यांचे विचार ऐकायला मिळावेत या हेतूने नियोजन करण्यात येत असून आरआयटी, भोकरे कॉलेज, बुधगाव कॉलेज, वालचंद महाविद्यालय आदी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खास आमंत्रित करण्यात आले असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.