Rajesh Tope : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या शरद पवारांच्या शिलेदाराचा पराभव

Rajesh Tope GHANSAWANGI Assembly Constituency : महायुती सरकारच्या काळात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याबरोबर त्यांची झालेली जवळीकी सर्वांनीच पाहिली. त्यामुळे मराठा फॅक्टर, करोना काळातील कार्य अन् शरद पवारांच्या समर्थनामुळे ते यंदाही बाजी मारतील अशी आशा होती. परंतु, ही आशा आता पुरती मावळली आहे.

Rajesh Tope manoj jarange
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपे यांचा पराभव (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rajesh Tope GHANSAWANGI : घनसावंगी विधानसभा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) नेते राजेश टोपे यांच्या कुटुंबियांचे वचर्स्व राहिलं आहे. तसंच, या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश टोपे यांच्यामुळे हा मतदारसंघ सतत चर्चेत राहिला. करोना काळातील करोना वॉरियर म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यानंतर महायुती सरकारच्या काळात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याबरोबर त्यांची झालेली जवळीकी सर्वांनीच पाहिली. त्यामुळे मराठा फॅक्टर, करोना काळातील कार्य अन् शरद पवारांच्या समर्थनामुळे ते यंदाही बाजी मारतील अशी आशा होती. परंतु, ही आशा आता पुरती मावळली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान एक चेहरा सतत त्यांच्या बाजूला दिसत राहिला. तो म्हणजे राजेश टोपे यांचा. मनोज जरांगे यांच्या मांडीला मांडी लावून ते त्यांची समजूत काढत असत. महत्त्वाच्या चर्चांमध्ये सहभागी होत असत. त्यामुळे मराठा समाजाची मते राजेश टोपेंना मिळतील अशी आशा हती. परंतु, मराठा फॅक्टर त्यांच्या कमी आला नाही.

घानसवांगी विधानसभा मतदारसंघातून उधान बळिराम यांना ९८ हजार ४९६ मते मिळाली असून राजेश टोपे यांना ९६ हजार ८७ मते मिळाली आहेत. अवघ्या २ हजार ३०९ मतांनी राजेश टोपे पराभूत झाले आहेत.

हेही वाचा >> राजेश टोपे यांना शिवसेनेचे आव्हान

घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास?

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा जालना जिल्ह्यात असून २००८ च्या मतदारसंघ फेररचनेनंतर अस्तित्वात आला आहे. त्यापूर्वी हा भाग अंबड विधानसभा मतदार संघात होता. २००८ मध्ये घनसावंगी तालुका आणि अंबड आणि जालना तालुक्यातील काही गावांचा मिळून घनसावंगी हा नवा विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. विशेष म्हणजे हा मतदारसंघ जालना जिल्ह्यात असला तरी तो परभणी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. घनसावंगी हा भाग १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तेव्हापासून या भागावर राजेश टोपे यांच्या कुटुंबियांचे वर्चस्व आहे. राजेश टोपे हे या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले होते. साखर कारखान्यांमुळे राजेश टोपे यांचा या मतदारसंघावर प्रभाव होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajesh tope ghansawangi defeted by udhan baliram manoj jarange sharad pawar sgk

First published on: 24-11-2024 at 00:24 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा