कोल्हापूर : चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल म्हणून प्रति टन ३७०० रुपये देण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केली. जयसिंगपूर येथे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २३ वी ऊस परिषद झाली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी बोलत होते. यावेळी या मागणीचा ठराव करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे ही वाचा… Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव

या परिषदेमध्ये काही महत्त्वाचे ठराव करण्यात आले. ते याप्रमाणे – गतवर्षी गाळपास केलेल्या उसाला दिवाळीपूर्वी प्रति टन २०० रुपयांचा हप्ता देण्यात यावा. पुरात नुकसान झालेल्या ऊस व अन्य पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. ऊस वजन काट्यात घोटाळे होत असल्याने ऑनलाईन सॉफ्टवेअर काटे बसवावेत. वाहतूक करणाऱ्या मुकादमांनी फसवणूक केली असून, अशांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. ऊस वाहतूक खर्चात भिन्नता आढळत असल्याने त्यामध्ये सुसूत्रता आणावी. नाबार्डने साखर कारखाना साखर कारन कर्ज तीन टक्के व्याजदराने द्यावे. सर्वच कृषी पंपांना बीज माफ करण्यात यावी.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetti demands 3700 rupees per tonne to sugarcane farmers this season asj