स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यातील शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमधून स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टींचा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होईल आणि मविआच्या पाठिंब्यावर ते निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होती. तसेच राजू शेट्टी यांच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर सातत्याने भेटीगाठी होत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळे राजू शेट्टी ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चादेखील रंगू लागली होती. ठाकरे गटाने राजू शेट्टींना तसा प्रस्तावदेखील दिला होता. परंतु, शेट्टी यांनी हा प्रस्ताव नाकारत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाचा प्रस्ताव नाकारण्याचं कारणही स्पष्ट केलं आहे.
“…म्हणून मी ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नाही”, राजू शेट्टींनी स्पष्ट केली भूमिका
राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानीने गेल्या तीन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची स्वतंत्र तयारी केली होती. परंतु, मधल्या काळात भाजपाविरोधातील मतांची विभागणी टाळण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा असा विचार आमच्या काही सदस्यांनी मांडला होता.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-04-2024 at 22:13 IST
TOPICSउद्धव ठाकरेUddhav Thackerayकोल्हापूरKolhapurराजू शेट्टीRaju Shettiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionस्वाभिमानीSwabhimani
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetti explains why he is not contesting election from shivsena thackeray faction ticket asc