Raju Shetti On Maha Vikas Aghadi and Mahayuti : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली असून विविध मतदारसंघात सध्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसंदर्भात उमेदवारांची आणि मतदारसंघाची चाचपणी नेत्यांकडून करण्यात येत आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

याच अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षाची तयारीही सुरु असल्याचं दिसून येत आहे. मात्र, असं असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठा दावा केला आहे. “महाविकास आघाडी आणि महायुती शेवटपर्यंत एकसंध राहतील असं वाटतं नाही”, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

राजू शेट्टी काय म्हणाले?

“चळवळीची पार्श्वभूमी असणारे राज्यातील छोटे-छोटे पक्ष असतील किंवा काही सामाजिक संघटना असतील या सर्वांना एकत्र करून त्या-त्या मतदारसंघात एखादा आश्वासक चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मतदारसंघाला दिशा देण्यासाठी त्या उमेदवाराकडे व्हिजन असेल असे उमेदवार शोधून त्यांच्या पाठिमागे उभा राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही मोजके प्रतिनिधी निवडून आणायचे जेणेकरून भविष्यात सत्ता कोणाचीही आली तरी त्यांच्यावर अंकुश ठेऊन सर्वसामान्य लोकांचे प्रश्न विधानसभेत त्यांनी मांडले पाहिजेत. यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे”, असं राजू शेट्टी म्हणाले.

“स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा शेतकरी चळवळीशी संबधित असलेल्या नेत्यांशी आणि छोट्या-छोट्या पक्षांशी आम्ही चर्चा करत आहोत. या सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न आमचा असेल. महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा सध्या खूप खालवला आहे. त्यामुळे आम्ही काही आश्वासक चेहरे देऊन जनतेसमोर एक चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला सत्तेची हाव नाही. पण सध्या ज्या पद्धतीचे राजकारण सुरु आहे, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी काही आश्वासक चेहऱ्यांची गरज आहे”, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं.

हेही वाचा : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अनेक घडामोडी घडणार

स्वाभिमानी शेतकरी संघटना भविष्यात महायुतीबरोबर जाऊ शकते का? या प्रश्नावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “आम्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापासून समान अंतर ठेवून आहोत. छोट्या-छोट्या घटकांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, अजून बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित २०१४ साली सर्वजण वेगवेगळे लढले होते, तसंही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सर्वांनाच एवढी महत्वकांक्षा लागलेली आहे की सर्वांनाच एकहाती सत्ता घेण्याचा मोह झालेला दिसत आहे. या सर्व नेत्यांकडे अमाप पैसा आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की महायुती किंवा महाविकास आघाडी शेवटपर्यंत एकसंध राहतील. अजून बऱ्याच घडामोडी घडणार आहेत”, असं सूचक विधान राजू शेट्टी यांनी केलं.

स्वाभिमानी भविष्यात सत्ताधारी पक्षाबरोबर जाणार का?

“आम्हाला सत्तेचा मोह कधीच नव्हता. अनेकवेळा आम्ही अशा पदावर आणि मोहावर लाथ मारलेली आहे. मात्र, आम्हाला या व्यवस्थेत एक बदल घडवायचा आहे. हा बदल घडवण्याचा मार्ग हा निवडणुका आहेत. त्या दुष्टीने आम्ही या निवडणुकीकडे पाहत आहोत. आमची एवढी ताकद नाही की आम्ही संपूर्ण परिवर्तन करू शकतो. मात्र, या व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत”, असं राजू शेट्टी म्हणाले.

Story img Loader