उसाला एकरकमी टनाला २ हजार ६५० रुपये भाव द्यावा अथवा एक वर्ष फुकट ऊस घ्यावा, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस दरासाठीचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार बठकीत केली. संघटनेचे आंदोलन हिंसक मार्गाला नेऊन चिरडून टाकण्याचा डाव ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील करीत असून अशा राजकारणात आपल्याला रस नसल्याचे त्यांनी सांगितले.
उसाला प्रतिटन तीन हजार रुपये दर मिळावा अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत जाहीर केली होती. केंद्र शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत लक्षात घेऊन गत वर्षीची उचल आणि अतिरिक्त ४०० रुपये अशी ही किंमत तीन हजार रुपये उत्पादकांनी मागितली होती.
साखर कारखान्यांनी या दराबाबत आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती. सरकारनेही ऊस दराबाबत नकारात्मक भूमिका घेऊन मध्यस्थी करण्यास नकार दिला. कर्नाटक, हरयाणा, उत्तर प्रदेश येथील राज्य शासनाने उसाचा दर जाहीर केला, मात्र महाराष्ट्र शासनाने नकारात्मक भूमिका घेतल्याने संघटनेला आंदोलनाशिवाय पर्याय उरला नव्हता.
राज्याचे ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शांततामय सुरु असणाऱ्या आंदोलनात घुसून िहसात्मक कारवाया करण्याचा कार्यकर्त्यांना दिलेला सल्ला म्हणजे चळवळ मोडीत काढण्याचाच डाव होता. आंदोलनात दंगा कसा घडेल हीच भूमिका घेऊन जयंत पाटील यांनी चिथावणीखोर आवाहन कार्यकर्त्यांना केले. याची चौकशी झाली पाहिजे, असे खा. शेट्टी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा