प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाबरोबर सरकारला पाठिंबा दिला आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर बच्चू कडू यांची मंत्रीपदी वर्णी लागेल, असं बोललं जात होतं. मात्र, अद्याप त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे बच्चू कडू हे सत्तेत नाराज असल्याची चर्चा आहे. सत्तेत सहभागी असूनही बच्चू कडू यांनी अनेकदा भाजपावर उघडपणे टीका केली आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बच्चू कडूंना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. सत्तेत गेल्यानंतर बच्चू कडू यांना गुदमरल्यासारखं होतं आहे. त्यांनी मागे फिरावं, असं थेट वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे. शिवाय आगामी निवडणुकीत बच्चू कडूंशी युती करण्याच्या प्रस्तावावरही राजू शेट्टी यांनी भाष्य केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “…एकनाथ शिंदेंचं ‘एन्काऊंटर’ केलं जाणार होतं”, शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान

बच्चू कडू यांच्या नाराजीबद्दल विचारलं असता राजू शेट्टी म्हणाले, “बच्चू कडू हे माझे चांगले मित्र आहेत. ते नेहमी अपंग, कष्टकरी आणि सामान्या लोकांच्या प्रश्नासाठी लढत असतात. अनेक लढाया आम्ही एकत्रित लढल्या आहेत. संघर्षशील नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. सत्तेत गेल्यापासून बच्चू कडू यांना गुदमरल्यासारखं होतं आहे. त्यामुळे माझा त्यांना सल्ला आहे की, त्यांनी मागे फिरावं. पुन्हा एकदा आपण रान पेटवू आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देऊ.”

हेही वाचा- सुप्रिया सुळेंनी पंकजा मुंडेंना दिली मदतीची हाक; म्हणाल्या, “भाजपाला जमत नसेल तर मी…”

आगामी निवडणुकीसाठी तुम्ही बच्चू कडू यांनी युतीचा करण्याचा प्रस्ताव देणार का? असं विचारलं असता राजू शेट्टी पुढे म्हणाले, “बच्चू कडूंनी तसा विचार केला तर आम्हीही नक्कीच विचार करू.पण प्रस्थापित पक्षांबरोबर जाण्याचा आमचा विचार नाही.”

Story img Loader