राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची परस्परविरोधी मते
नोटाबंदीनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर रिझव्र्ह बँकेने लादलेल्या र्निबधावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले असून या र्निबधाचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी समर्थन केले आहे तर या भूमिकेला छेद देत संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी या र्निबधामुळे शेतकरी अडचणीत आला असून तोडगा काढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
नोटाबंदीनंतर जुन्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकांना मनाई करण्यात आली. यानंतर सुरुवातीच्या काळात कोटय़वधी रुपयांच्या जुन्या हजार, पाचशेच्या नोटा जिल्हा बँकाकडे जमा झाल्या. मात्र नवीन नोटा चेस्ट करन्सीकडून देण्यात टाळाटाळ होत असल्याने जिल्हा बँकेची आíथक कोंडी झाली आहे. याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाची दखल घेत खा. राजू शेट्टी यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्हा बँकेची झालेली अडचण आपण केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांच्या कानावर घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
मात्र तत्पूर्वी राज्यमंत्री खोत यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही मंडळी काळा पसा पांढरा करण्याचा प्रयत्न करतील असे सांगत घालण्यात आलेल्या र्निबधाचे समर्थन केले होते. या भूमिकेच्या विरुद्ध खा. शेट्टी यांनी भूमिका घेतली असून यावर प्रशासक नियुक्त करून जिल्हा बँकेचा कारभार सुधारता येऊ शकतो, मग नोटाबंदीनंतर याच पद्धतीने एखादा चांगला अधिकारी नियुक्त करून या अडचणीवर मात करता येऊ शकते, अशी भूमिका मांडली आहे.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेवर घालण्यात आलेल्या र्निबधामुळे यंदाचा उस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा अवधी होत आला, तरी शेतकऱ्यांच्या हाती पहिल्या टप्प्यात गाळपासाठी गेलेल्या उसाचे पसे मिळालेले नाहीत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षकासह जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांचे वेतनही जमा झाले आहे. मात्र चलनटंचाईमुळे पसे मिळत नसल्याने आíथक कोंडी झाली आहे.