Maharashtra Rajya Sabha Election 2022 Updates : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान झालं. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली. त्यांना उच्च न्यायालयात दिलासा मिळावा, असे प्रयत्न झाले परंतु, आघाडीचे दोन मतांचे गणित बिघडले. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते मिळण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा आहे. परंतु ठाकूर यांनी स्पष्ट भूमिका जाहीर न केल्यानं साशंकता आह़े. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मतासाठी चुरस पाहायला मिळाली. शुक्रवारी (१० जून) रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर झाला नाही.

Live Updates

Rajya Sabha Election 2022 Live Updates : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

10:21 (IST) 10 Jun 2022
महाविकासआघाडी एकसंघ असून आमचा विजय सुनिश्चित आहे – नितीन राऊत

महाविकासआघाडी एकसंघ असून आमचा विजय सुनिश्चित आहे. आम्ही संपूर्ण कर्तव्यदक्ष पणाने या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहोत. ज्या प्रकारे भाजपाने कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामध्ये ते सफल होणार नाहीत. एमआयएमने कोणाला पाठिंबा द्यावा हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे महाविकासआघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत.

10:15 (IST) 10 Jun 2022
निवडणुकीत मतदान करणाऱ्या आमदारांची पक्षनिहाय संख्या

भाजपा-१०६ , शिवसेना -५५ , राष्ट्रवादी- ५३, काँग्रेस-४४, अपक्ष व छोटे पक्ष -२९

10:13 (IST) 10 Jun 2022
राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात हे आहेत सात उमेदवार

प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजपा), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजपा), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजपा)

10:10 (IST) 10 Jun 2022
राज्यसभा निवडणुकीसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते

राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. त्यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना आपल्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवून मतदान करावे लागते. आमदाराने पक्षादेश धुडकावल्यास त्या आमदाराच्या विरोधात पक्षाला पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई करता येते. अपक्षांना मात्र मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते.

10:09 (IST) 10 Jun 2022
जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेच आमदार विधानभवनात दाखल

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी शिवसेनेचे आमदार घोषणाबाजी करत विधानभवनात दाखल झाले आहेत.

10:02 (IST) 10 Jun 2022
राज्यसभा निवडणुकीत MIM चा पाठिंबा कोणाला?

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ‘एमआयएम’ची दोन मते शिवसेनेसाठी अडचणीची ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. यादरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सविस्तर बातमी

10:02 (IST) 10 Jun 2022
गंभीर आजाराने त्रस्त असतानाही लक्ष्मण जगताप करणार मतदान

पुण्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव लक्ष्मण जगताप मतदान प्रक्रियेत सहभागी होणार की नाही असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून होता. अखेर ते रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

सविस्तर बातमी

10:01 (IST) 10 Jun 2022
“महाविकास आघाडीतला एक संजय जाणार,” भाजपाच्या अनिल बोंडे यांचं मोठं विधान

राज्यसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. १०० टक्के आत्मविश्वास आहे, आमच्या मनात अजिबात धाकधूक नाही असं अनिल बोंडे यांनी विधीमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसं या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणार हे नक्की आहे असंही विधान यावेळी त्यांनी केलं.

सविस्तर बातमी

09:50 (IST) 10 Jun 2022
राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कोटा वाढवला; शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारास धोका!

राष्ट्रवादी नंतर काँग्रेसने देखील कोटा वाढवला असून, तो ४४ केला आहे. याचबरोबर शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारास धोका वाढल्याचं दिसत आहे.

09:42 (IST) 10 Jun 2022
काँग्रेसकडून मतदान प्रतिनिधी बाळासाहेब थोरात, नाना पटोले

काँग्रेसकडून मतदान प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले आहेत. तर मतमोजणीसाठी सुनील केदार आणि सतेज पाटील हे प्रतिनिधी आहेत.

09:39 (IST) 10 Jun 2022
भाजपाच्या आठ आमदारांचं मतदान झालं

आतापर्यंत या निवडणुकीसाठी भाजपाच्या आठ आमदारांचं मतदान झालं असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, भाजपाच्या आमदारांची चौथी बस विधानभवनात दाखल झाली आहे.

09:38 (IST) 10 Jun 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षाचे आमदार विधीमंडळात पोहचत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधानभवनात दाखल झाले आहेत.

09:36 (IST) 10 Jun 2022
छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या २० आमदारांच मतदान झालं

राज्यसभा निवडणुकीसाठी आज होत असलेल्या मतदानात सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं मतदान सुरु आहे. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या २० आमदारांचं आतापर्यंत मतदान झालं आहे.

09:28 (IST) 10 Jun 2022
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानंतर शिवसेना करणार मतदान

राज्यसभा निवडणुकीसाठी अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार मतदान करणार असून, त्यानंतर शिवसेनेचे आमदारा मतदान करणार आहेत.

09:23 (IST) 10 Jun 2022
राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमचा महाविकासआघाडीला पाठिंबा

राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमचा महाविकासआघाडीला पाठिंबा मिळाला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत घोषणा केली आहे.

09:19 (IST) 10 Jun 2022
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वात अगोदर केले मतदान

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वात अगोदर मतदानाचा हक्क बजावला.

09:16 (IST) 10 Jun 2022
सर्व पक्षीय आमदार विधानभवनात दाखल होण्यास सुरुवात

राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आमदार विधानभवनात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

09:15 (IST) 10 Jun 2022
राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या मतदाना संदर्भातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर