“भाजपाला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात. परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केला.” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Rajya Sabha election: महाविकास आघाडीचा उमेदवार मागे घ्या म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही, त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजपा करणार नाही असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल.”, असेही जयंत पाटील म्हणाले.

Story img Loader