अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने २५ मार्चला मुंबईत आझाद मदानावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात येणार आहेत. राज्यातील १ लाख १० हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस यात सहभागी होणार आहेत.
आघाडी सरकारने एप्रिल २०१४पासून अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ९५० व मदतनिसांच्या मानधनात ५०० रुपयांची तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ५५० रुपयांची वाढ केली होती. ही मानधनवाढ सध्याचे सरकार बुडवण्याच्या मार्गावर आहे, असा आरोप अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाने केला. दिवाळीची भाऊबीज भेट सरकारने सुरूकरावी. जानेवारी २०१४च्या संपकाळातील मानधन द्यावे, सेवा समाप्तीच्या लाभाच्या शासकीय आदेशाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी, उन्हाळी सुटी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना एकत्रित द्यावी, आजारी रजा एक महिन्याच्या कराव्यात, एक महिन्याच्या मानधनाएवढी भाऊबीज भेट कायम करावी, मानधनवाढीचा प्रलंबित प्रश्न सोडवावा आदी मागण्या आहेत.
मानधनवाढ मिळेपर्यंत मासिक प्रगती अहवाल देण्यावर व शासकीय बठकांवर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार राहील, अशी माहिती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, राज्य सचिव प्रभावती गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष कमल बांगर, गोिवद शेळके, प्रभावती पवार, सिंधू ठाकूर यांनी दिली. मोर्चात अंगणवाडी सेविकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड, संघटक दत्तात्रय देशमुख यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा