पन्नगेश्वर साखर कारखान्याला मार्च महिन्यात दिलेल्या उसाचे पैसे अजून न दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून साखर विक्रीस नेणाऱ्या मालमोटारीची नासधूस केली. या प्रकरणी मनसेचे जिल्हाप्रमुख संतोष नागरगोजे यांच्यासह दहा जणांना रेणापूर पोलिसांनी अटक केली.
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर शुगर मिल्स या खासगी साखर कारखान्याला परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी दिला. कारखान्याने शेतकऱ्याला पहिला हप्ता प्रतिटन दीड हजार रुपये दिला. या वर्षी साखरेचे भाव कोसळल्यामुळे साखर कारखाने अडचणीत आहेत, हे मान्य करूनही मार्चमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला, त्यांना पहिल्या हप्त्याचीही रक्कम कारखान्याने दिली नाही. कारखान्याचे गाळपही बंद झाले. बुधवारी साखर विक्रीसाठी कारखान्याबाहेर मालमोटारी नेल्या जात असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या उसाचे पसे कधी देणार? हे कारखान्याने जाहीर करावे, अशी मागणी या वेळी कार्यकर्त्यांनी केली. चार तास रास्ता रोको केल्यानंतरही कारखान्याच्या वतीने कोणतेच आश्वासन न मिळाल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी काही मालमोटारींच्या काचा फोडल्या. या प्रकरणी मनसेचे जिल्हाप्रमुख संतोष नागरगोजे यांच्यासह दहा जणांना रेणापूर पोलिसांनी अटक केली.
मनसेची स्टंटबाजी – भंडारे
साखरेचे भाव पडल्यामुळे कधी नव्हे ते साखर कारखाने आíथक अडचणीत सापडले आहेत. मार्चमधील शेतकऱ्यांनी घातलेल्या उसाचे पसे देणे अजून बाकी आहे. साखर विक्री केल्याशिवाय हे पसे शेतकऱ्याला कारखाना देऊ शकत नाही. शेतकऱ्यांचे पसे कारखाना देणारच आहे. फक्त या वर्षी आíथक संकटामुळे पसे देण्यास थोडा उशीर होत आहे. मनसेने सुरू केलेले आंदोलन ही स्टंटबाजी असून केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी त्यांची धडपड आहे. आम्ही काही शेतकऱ्यांचे शत्रू नसल्याचे कारखान्याचे अध्यक्ष किशनराव भंडारे यांनी सांगितले.

Story img Loader