भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची रविवारी (दि. ३०) येथे जाहीर सभा होणार आहे. गुरुगोविंदसिंग स्टेडियमवर सकाळी ११ वाजता ही सभा होईल. भाजपने सभेची जय्यत तयारी सुरू केली आहे.
महायुतीमध्ये नांदेड मतदारसंघ भाजपकडे आला आहे. काँग्रेसने बुधवारी जोरदार प्रदर्शन केल्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी यांची सभा भव्यदिव्य करण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचे उमेदवार डी. बी. पाटील यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या सभेच्या यशस्वितेची जबाबदारी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्यावर टाकली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात काही मोकळ्या जागांची पाहणी केली. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्टेडियमची जागा निश्चित करण्यात आली. वाहनतळाची व्यवस्था नवा मोंढा येथील मैदानावर करण्यात आली आहे.

Story img Loader