लातूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तसेच कचरा व एलबीटी प्रश्नासंबंधी महापालिकेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी (दि. ११) मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती पक्षनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नांदगावकर मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवस लातूरचा दौरा आटोपल्यानंतर मंगळवारी रात्री ते पत्रकार बैठकीत बोलत होते. जिल्हय़ातील तरुण मोठय़ा संख्येने मनसेकडे वळत असून, सर्व सहा विधानसभा मतदारसंघांत मनसेचे उमेदवार राहतील. दोन ते तीन आमदार लातूरमधून मिळतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
विलासराव देशमुख यांचे मनसेशी चांगले संबंध होते. अमित देशमुख व राज ठाकरे यांची मत्री असली, तरी लातूर शहर मतदारसंघात मनसेचा उमेदवार दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लातूर महापालिकेच्या कारभारावर जनता नाराज असून, गेल्या दोन वर्षांत महापालिकेने कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. त्यामुळेच मनसेने मोर्चाचे आयोजन केल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, संपर्कप्रमुख साईनाथ दुग्रे उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा