Swami Govinddev Giri on Vote Jihad: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत व्होट जिहाद आणि धर्मयुद्ध हे दोन शब्द वारंवार प्रचारात येत आहेत. भाजपाकडून व्होट जिहादचा मुद्दा पुढे केला जात आहे. तसेच सज्जाद नोमानी यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला एक व्हिडीओ भाजपाकडून दाखवला जात आहे. या व्हिडीओमध्ये सज्जाद नोमानी व्होट जिहाद शब्दाचा उल्लेख करत आहेत. या व्हिडीओवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली असून. ते प्रत्येक सभेत याचा उल्लेख करत आहेत. आता श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनीही व्होट जिहादवर प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदू समाजाने एकत्र येऊन याचा विरोध करावा
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी केली होती. यावर बोलताना स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, “राजकीय लढतींना व्होट जिहाद म्हणणे चुकीचे ठरेल. कुणाला मतदान करावे, हे सांगण्यासाठी पूर्वी धार्मिक स्थळावरून पत्रक काढले जात होते. पण आता व्होट जिहादसारख्या घोषणा खुलेआम होत आहेत. हिंदू समाजाने न घाबरता याचा पूर्ण ताकदीनिशी मुकाबला केला पाहीजे. खरा हिंदू हा मानवतेचा पाईक असतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करत सर्वांशी समान व्यवहार केला पाहीजे. तसेच अन्यायही कधीच सहन करू नये.”
माध्यमांशी बोलत असताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्होट जिहादच्या घोषणांवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच मात्र दोन राजकीय पक्षांच्या लढाईला धर्म युद्ध म्हणणे चुकीचे ठरेल, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी व्होट जिहादचा मुकाबला करण्यासाठी व्होट धर्म युद्धाने करू असे म्हटले होते. महायुती सरकारविरोधात सज्जाद नोमानी यांनी व्होट जिहादचे आवाहन केले असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. फक्त महाराष्ट्रच नाही तर केंद्रातील सरकारही अस्थिर करण्याबाबत नोमानी यांनी व्हिडीओत भाष्य केले असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता.
हे ही वाचा >> Sharad Pawar on Vote Jihad: ‘पुण्यात विशिष्ट समाजाचे लोक भाजपाला मतदान करतात’, व्होट जिहादवरून शरद पवारांचा फडणवीसांना टोला
u
\
सज्जाद नोमानी व्हिडीओत काय म्हणाले?
सज्जाद नोमानी यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर सदर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. १६ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये सज्जाद नोमानी यांनी मुस्लीम समाजाला योग्य मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणतात, “मी हे निश्चित सांगू शकतो की, महाराष्ट्राच्या निवडणुकीला आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जर इथे हरियाणाप्रमाणेच त्यांचा (भाजपा) विजय झाला तर त्यांचा आत्मविश्वास आणखी मजबूत होईल. त्यानंतर दिल्ली सरकार नव्या आत्मविश्वासाने आपल्या वाईट हेतूंच्या दिशेने मार्गक्रमण करेल. जर महाराष्ट्रात त्यांचा (भाजपाचा) पराभव झाला, दिल्लीमधले त्यांचे सरकार अधिक काळ टीकू शकणार नाही. त्यामुळे आपल्या निशाण्यावर फक्त महाराष्ट्राचे सरकार नाही, तर दिल्लीही आहे.”