“रामनवमीच्या दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे”, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात घमासान सुरू झाले आहे. “जितेंद्र आव्हाड हे कट्टर हिंदुत्वविरोधी आहेत”, अशी प्रतिक्रियाही शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी दिली. तसंच, आव्हाडांच्या या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशीही मागणी जोर धरू लागली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

“रामनवमीच्या दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे. खरं तर येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल कारण सत्ताधारी देशातील युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत. महागाई कमी करू शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधाऱ्याकडे धार्मिक सोहळे करून मत मिळवल्याशिवाय पर्याय नाही”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड शुक्रवारी पक्षाच्या शिबिरात म्हणाले.

हेही वाचा >> “रामनवमी अन् हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच…”; जितेंद्र आव्हाडांचं विधान चर्चेत!

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय?

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोकळा श्वास आणि मन मोकळं करायचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जर कोणी काही वक्तव्य केलं असेल तर त्यावर लगेच गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे. सर्वच राजनेत्यांनी ही पद्धत थांबवली पाहिजे. कोणीही काहीही बोललं असेल तर लगेच केस न करता आपण सर्वांनी मिळून तारतम्य बाळगलं पाहिजे, लगेच केस करणं यावर विचार केला पाहिजे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.

“दादा मनमोकळेपणाने त्याच्या मनातील गोष्ट खरेपणाने बोलले असतील, त्यात गैर काय?” असा प्रतिसवालही सुप्रिया सुळेंनी विचारला आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याचा मानस केल्यानंतरही त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram navami and hanuman jayanti only to create riots in the state supriya sules reaction to jitendra awadas statement she said if anyone has said anything sgk
Show comments