शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिंदे गटातील नेते आपली खदखद वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. शिंदे गटात नुकतेच सामील झालेले शिवसेना नेते रामदास कदम यांनीदेखील शिवसेनेच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. मी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत असल्यामुळे मला १९९५ साली मंत्रिपद देण्यात आले नाही, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या मुलाखतपर कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा >>> “तीन मुलं आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की…” ‘त्या’ आरोपावर रामदास कदमांनी केली भूमिका स्पष्ट

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप काही दिलं. पण १९९५ साली आमची सत्ता आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात असूनही मी मंत्री का झालो नाही, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारावं. तुझं नाव मंत्र्यांच्या यादीमध्ये आहे. पण तुला मंत्रिमंडळात घेण्यावरुन माझ्या घरी भांडण होत आहे, असे मला बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते. फक्त मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो, म्हणून मला मंत्रिपद दिले गेले नाही,” असा आरोप रामदास कदम यांनी केला.

हेही वाचा >>> मनावर दगड ठेवून भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले – चंद्रकांत पाटील

“मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो, म्हणून मला मंत्रिपद दिले गेले नाही. राज ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्यांना मंत्रिपद द्यायचे नाही, अशी भूमिका कदाचित त्यांची होती. मी तुला मंत्रिमंडळात घेणार, असे मला बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. पण माझ्यामुळे तुमच्या घरात भांडण होत असतील तर मी थांबतो, असे मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले होते,” असे रामदास कदम यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “मुंबईचे लोक करोनाने मरत असताना आदित्य ठाकरे संध्याकाळी सातनंतर डिनो मोरियाच्या घरी काय करायचे?” नितेश राणेंचा सवाल

तसेच पुढे बोलताना कदम यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिल्याच्या आरोपावरही भाष्य केले. “किरीट सोमय्या यांना रिझवान काझी यांनी माहिती दिली होती. किरीट सोमय्या यांना सर्व माहिती मी दिली आहे, असे रिझवान काझी यांनी स्वत: सांगितलेले आहे. अनिल परब यांची माणसं मला हफ्ते मागत होते, म्हणून मी हे केले, असे काझी यांनी सांगितलेले आहे. मी तुळजाभवानी, बाळासाहेब ठाकरे तसेच माझ्या तीन मुलांची शपथ घेऊन सांगतो, की आजपर्यंत मी किरीट सोमय्या यांना कधीच बोललो नाही. हे सगळं कटकारस्थान अनिल परब यांनी केले,” असे कदम यांनी सांगितले.

Story img Loader