Ramdas Athavle on NCP Split: वर्षभरापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला होता. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अशीच फूट पडून अजित पवार गट वेगळा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवारांसोबत गेलेले आमदार ‘आम्ही राष्ट्रवादीतच’ असा दावा करत असले, तरी जयंत पाटलांनी शपथ घेतलेल्या ९ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदाव्यांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. त्यात आता रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील ८ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. खुद्द अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शरद पवार पक्ष पुन्हा उभारण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. त्यामुळे नेमकं पुढे काय होणार? याविषयी प्रचंड उत्सुकता असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्याबाबत सूचक विधान केलं आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO

काय म्हणाले रामदास आठवले?

“आम्ही अजित पवारांना तोडलेलं नाही. ते स्वत: आमदार तोडून इकडे आले आहेत. शिवाय फक्त अजित पवारच नाही. काही दिवसांनी बिहारमध्येही अशाच प्रकारचं बंड होऊ शकतं. कारण नितीश कुमार यांच्या निर्णयांवर तिथली जनता आणि त्यांचे आमदार नाराज आहेत. राजद सोडून ते भाजपाबरोबर आले. नितीश कुमारांचे ४५ आमदार निवडून आले असताना भाजपाचे ७७ आमदार असूनही मोदींनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. पण काही दिवसांनी ते पुन्हा राजदसोबत गेले. त्यामुळे नितीश कुमार यांच्याविरोधातही नाराजी आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.

उत्तर प्रदेशातही बंडखोरी?

दरम्यान, महाराष्ट्र व बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशाचही विरोधकांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता रामदास आठवलेंनी व्यक्त केली. “उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत येऊ शकतात. ते पाटण्याच्या बैठकीला गेले नव्हते. आजकाल ते अखिलेश यादव यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे तेही आमच्याबरोबर येऊ शकतात. पुढे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या आमदारांमध्येही फूट पडू शकते”, असंही रामदास आठवलेंनी नमूद केलं.

Story img Loader