Eknath Shinde And Ramdas Athawale : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा उलटला आहे. अशात महायुतीला बहुमत मिळूनही राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेले नाही. एककीकडे एकनाथ शिंदे मुख्यंत्रीपदासाठी अडून बसल्याच्या चर्चा असताना, भाजपाने देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित केल्याचेही बोलले जात आहे. अशात महायुतीमध्ये असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, “भाजपाने मुख्यमंत्रीपदावर दावा करत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाखूष आहेत.”

दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी एनडीटीव्हीशी बोलताना रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले मागच्या कार्यकाळात सर्वाधिक आमदार असतानाही भाजपाने शिवसेनेला (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्रीपद दिले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्याचप्रकारे आता एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे.

Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद; म्हणाले, “आमच्याकडे राजकारण…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sudhir Tambe On Balasaheb Thorat
Sudhir Tambe : बाळासाहेब थोरातांबाबत सुधीर तांबेंचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपात गेले असते तर आज…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Marathi Marwadi conflict in Mumbai
Marwadi vs Marathi Conflict : “मुंबईत भाजपाची सत्ता, मारवाडीतच बोलायचं”, मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी; मनसेचं खळखट्याक!
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान

काय म्हणाले रामदास आठवले?

संसद भवनाबाहेर रामदास आठवले यांना मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्यास इतका विलंब का होत आहे, याबाबात विचारण्यात आले होते. तेव्हा आठवले म्हणाले, “भाजपा हायकमांडने एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे की, ते मुख्यमंत्रीपद सोडणार नाहीत. कारण त्यांनी गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत शिंदे यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे अधिकृतपणे जाहीर झाले नसले तरी भाजपाने देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित केले आहे.”

५ डिसेंबरला शपथविधी

दरम्यान निवडणून आलेले भाजपाचे १३२ आमदार आज पक्षाचा विधीमंडळ नेता निवडणार आहेत. या निवडीनंतर मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी महायुतीचा शपथविधी ५ डिसेंबरला होणार असल्याचे जाहीर केले आहे.

हे ही वाचा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे देवेंद्र फडणवीसांना का भेटले? ‘हे’…

भाजपाने जिंकल्या सर्वाधिक जागा

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवत २३० जागा जिंकल्या. यामध्ये भाजपाच्या पारड्यात १३२ जागा पडल्या. दुसरीकडे शिवसेनेने (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या. दरम्यान राष्ट्रवादीने (अजित पवार) भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडल्यानंतर अडीच वर्षांसाठी भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले होते. पण आता हे पद सोडण्यासाठी भाजपा तयार नाही. इतकेच नव्हे तर भाजपाने पाच नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारीही सुरू केली आहे.