Ramdas Athawale On Saif Ali Khan Attack : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याची घटना आज (१६ जानेवारी) घटना घडली. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफ अली खान त्याच्या मुंबईतील घरी असताना घरात अचानक एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश करत सैफ अली खानवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खानला सहा जखमा झाल्या. त्यानंतर सैफ अली खानला तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या सैफ अली खानवर उपचार सुरु आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेबाबत आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आता या घटनेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी आता मुंबई पोलिसांना सक्त सूचना देण्याची आवश्यकता असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

रामदास आठवले काय म्हणाले?

“बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर मी त्यांना भेटून आलो. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती त्यांनी मला दिली. सैफ अली खानवर झालेला हल्ला निषेधार्थ आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी होता, तो पैसे दिले पाहिजे असं काहीतरी बोलत होता. मात्र, त्यानंतर सैफ अली खानवर त्या व्यक्तीने वार केले. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. कारण अशा प्रकारे कायदा आणि सुव्यव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं सरकार गंभीर आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडता कामा नये, यासाठी मुंबई पोलीस प्रयत्न करतील. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो व्यक्ती त्या ठिकाणी चोरी करण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचा चोरीचा प्रयत्न फसल्यामुळे त्याने हल्ला केला असावा”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणार

“अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेच्या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अद्याप बोललेलो नाही. मात्र, मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांना सक्त सूचना देण्याची आवश्यकता आहे”, असं रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale on bollywood actor saif ali khan attack in mumbai and devendra fadnavis mumbai police gkt