“गावा-गावतली म्हणते आहे पारु माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु” अशी शीघ्र कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरे सरकारकडे वाईन शॉप्स सुरु करु नका अशी मागणी केली आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओच त्यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले आहेत आठवले?
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारकडे महसुलाचा विचार करुन वाईन शॉप्स सुरु करावीत अशी सूचना मा. उद्धव ठाकरे यांना केली आहे. त्यासंबंधी माझं राज्य सरकारला निवेदन आहे, की लॉकडाउनच्या कालखंडात अनेक लोक जे दारु पित होते, नशा करणारे होते. दारुची दुकानं बंद असल्याने त्यांची दारु बंद झाली आहे. अनेक लोकांचे उद्ध्वस्त होणारे संसार सावरले जात आहेत. अनेक घरांमधल्या महिला खुश आहेत. गावा-गावतली म्हणू लागली आहे पारु आता माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु. अशा पद्धतीचं आनंदाचं वातावरण महिलांमध्ये आहे. छोट्याश्या महसुलासाठी दारुची दुकानं सुरु केली तर मद्यपान करणाऱ्या लोकांना वाव मिळेल. त्यामुळे दारुची दुकानं सुरु करणं योग्य राहणार नाही असं माझं सरकारला निवेदन आहे”

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र पाठवून राज्य सरकारने महसुलासाठी वाईन शॉप सुरु करण्याचा विचार करावा अशी सूचना केली होती. त्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीकाही करण्यात आली. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही लॉकडाउनच्या काळात वाईन शॉप सुरु करु नये असं निवेदन व्हिडीओद्वारे केलं आहे.