मुख्यमंत्री व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. अजित पवारांचीही आहे. मात्र, ती सगळ्यांचीच पूर्ण होत नाही. पवार भाजपमध्ये आले तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी लवकर मिळेल असे नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील, असे सूतोवाच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
आठवले हे सांगली दौऱ्यावर जात असताना सातारा येथे थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यामध्ये कुटुंबियांशी, शेतकऱ्यांशी भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यावर टांगती तलवार नसून, ती उध्दव ठाकरे यांच्यावर आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले नसते. संजय राऊतांच्या भुलथापांना बळी पडून ठाकरे राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेले. उध्दव यांनी आमदारांची कामे केली नाहीत. लोकांना भेटत नव्हते. त्यामुळेच शिवसेनेत महाबंड झाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्याच बाजूने लागेल. त्यांच्या पदाला धोका होणार नाही. महायुती भक्कम आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत बॅनर लावणारे उत्साही कार्यकर्ते असतात. मुख्यमंत्री होण्याची इच्छा अनेकांची असते. पण, ती पूर्ण होत नाही. यापूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार आले होते, तेव्हा अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. पण, तेव्हा संधी मिळाली नाही. आता लवकर संधी मिळेल असे नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत, जनतेशी संवाद साधणारे आहेत, ते भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागत आहे. मात्र, तरीही शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, असेही मंत्री आठवले म्हणाले.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला

राज ठाकरे यांनी स्वतंत्र रहावे. त्यांना भाषण करायला आवडते. ते आमच्यासोबत आले तर त्यांना येवढे भाषण करायला मिळणार नाही. त्यांची आम्हाला आवश्यकता नाही. त्यांना सोबत घेणे भाजपला देश पातळीवर परवडणारे नाही. माझा पक्ष आहे, तोपर्यंत राज ठाकरेंची आवश्यकता नाही, असा टोमणाही मंत्री आठवले यांनी लगावला. रिपब्लिकन पक्षाचे शिर्डी येथे दि. २८ मे रोजी देशव्यापी अधिवेशन आहे असे त्यांनी सांगितले..

Story img Loader