मुख्यमंत्री व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. अजित पवारांचीही आहे. मात्र, ती सगळ्यांचीच पूर्ण होत नाही. पवार भाजपमध्ये आले तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी लवकर मिळेल असे नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील, असे सूतोवाच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
आठवले हे सांगली दौऱ्यावर जात असताना सातारा येथे थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यामध्ये कुटुंबियांशी, शेतकऱ्यांशी भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यावर टांगती तलवार नसून, ती उध्दव ठाकरे यांच्यावर आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले नसते. संजय राऊतांच्या भुलथापांना बळी पडून ठाकरे राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेले. उध्दव यांनी आमदारांची कामे केली नाहीत. लोकांना भेटत नव्हते. त्यामुळेच शिवसेनेत महाबंड झाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्याच बाजूने लागेल. त्यांच्या पदाला धोका होणार नाही. महायुती भक्कम आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा