शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आंबडेकरांच्या या सल्ल्यानंतर यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेब (प्रकाश आंबेडकर) कधी कधी चांगला सल्ला देतात. या सल्ल्यावर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या सल्ल्याला माझाही पाठिंबा आहे असं आठवले म्हणाले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, हा प्रकाश आंबेडकरांचा चांगला सल्ला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दोस्ती होती. ही दोस्ती आता आहे की नाही ते माहिती नाही. परंतु त्यांनी दिलेला सल्ला उद्धव ठाकरे यांनी मान्य करायला हरकत नाही. परंतु उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा सल्ला ऐकतात की शरद पवारांचा ते लवकरच कळेल. मात्र प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला योग्य आहे, या सल्ल्याला माझाही पाठिंबा आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
Samajwadi Party objects to Thackeray groups Hindutva stance print politics news
ठाकरे गटाच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर ‘सपा’चा आक्षेप

बुधवारी संध्याकाळी मुंबईच्या भांडुपमध्ये वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा पार पडली. यावेळी डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना सतर्क राहण्याचा इशाराही दिला आहे. “महाविकास आघाडीच्या नादी लागू नका”, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

हे ही वाचा >> करोनापेक्षा भयंकर रोग येतोय? ‘डिसीज एक्स’बद्दल WHO च्या इशाऱ्याने टेन्शन वाढवलं

प्रकाश आंबेडकर यांनी योग्य सल्ला दिला आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांचं ऐकावं असं आठवले यांनी म्हटलं आहे.

Story img Loader