आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी येत्या महिनाभरात शिवसेना, भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन पक्षात जागा वाटपासाठी बैठक होणार असून लोकसभेच्या ४ व विधानसभेच्या ३५ जागा आम्ही मागणार आहोत, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास आठवले यांनी दिली.
सरकारी विश्रामगृहावर आठवले हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव उपस्थित होते.
आठवले म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या समवेत जागा वाटपासाठी बैठक होणार असून आमच्या वाटय़ाला आलेल्या जागांवर ५० टक्के उमेदवार हे दलितेतर असतील. मराठा व इतर मागासवर्गियांना प्रतिनिधीत्व देऊन रिपब्लिकन पक्षाचा चेहरा अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. मी लोकसभेची निवडणूक लढवायची की राज्यसभेवर जायचे याचा निर्णय आपण घेतलेला नाही. लोकसभेसाठी रामटेक, लातूर व मुंबई दक्षिणमधून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला जात आहे. राज्यात सत्तांतर होणार असल्याने विधानसभा लढविण्याचाही आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. असे ते म्हणाले.
शिवशक्ती व भिमशक्ती एकत्र आल्याने राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. २८८ मतदारसंघात पाच हजार ते २५ हजार निर्णायक दलित मते आहेत. त्यामुळे आता दोन्ही काँग्रेसला १५५ पेक्षा कमी जागा मिळतील. महसलमंत्री बाळासाहेब थोरात हे संगमनेर व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांचा पराभव करणे शक्य नाही. पण श्रीरामपरची जागा काँग्रेसकडून आम्ही घेवू शकतो. अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असली तरी १० वर्षांपासून माझी तशी इच्छा आहे. आगोदर मला मुख्यमंत्री होऊ द्या. मनसेचे उद्धव ठाकरे यांना मागील निवडणुकीत दलितांचा पाठिंबा मिळाला. पण आता मनसेतून दलित मोठय़ा प्रमाणात बाहेर पडले. त्यांना तेथे निट वागणूक मिळत नाही. राज यांची भुमिका दलितांना मान्य नाही. त्यांनी सभा घेण्याचे काम करावे. दलितांच्या मतांची अपेक्षा करू नये असा टोला त्यांनी लावला.
रिपब्लिकन पक्षाचे होणार नाही. त्यामुळे आता आम्ही तो प्रयोग सोडून दिला आहे. ऐक्यामुळे दलितांची राजकीय ताकद वाढू शकेल. पण नेत्यांमुळे ऐक्य होऊ शकत नाही. दलितांमध्ये तळागाळात रिपब्लिकन पक्ष पोहचलेला आहे. इतर नेते कागदावर आहेत. त्यामुळे त्यांचा फारसा फरक पडणार नाही. असे सांगन आठवले म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघात माझा पराभव नेत्यांनी केला. आता दलितांवर अत्याचार वाढले आहेत. माझा पराभव झाल्याने हे घडले आहे. नवी दिल्ली येथे पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी दि. १३ रोजी मोर्चा नेण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले.
आठवलेंना हव्यात लोकसभेच्या ४ तर विधानसभेच्या ३५ जागा
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी येत्या महिनाभरात शिवसेना, भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन पक्षात जागा वाटपासाठी बैठक होणार असून लोकसभेच्या ४ व विधानसभेच्या ३५ जागा आम्ही मागणार आहोत, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास आठवले यांनी दिली. सरकारी विश्रामगृहावर आठवले हे पत्रकारांशी बोलत होते.

First published on: 08-03-2013 at 01:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale want 4 seat of lok sabha and 35 seat of assembly