माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रामदास कदम आणि त्यांचा मुलगा योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्यासाठी कशाप्रकारे कट रचण्यात येत होता, याबाबत धक्कादायक खुलासा रामदास कदम यांनी केला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांचा उल्लेख ‘बेडूक’ असा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “त्यांच्यावर अन्याय होतोय, हे…”, पंकजा मुंडेंना शिवसेनेत घेण्याबाबत ठाकरे गटाच्या आमदाराचं सूचक विधान

मला आणि माझ्या मुलाला संपवण्यासाठी मातोश्रीत कशा बैठका पार पडायच्या, हे उदय सांमत सांगतील. तेही या बैठकीत असायचे, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी हा दावा केला आहे.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंना अंधारेबाईच्या पदराचा…”, बाळासाहेबांना काय वाटत असेल म्हणत रामदास कदमांची जोरदार टीका

अनिल परब हा बेडूक असून त्यांनी माझा मुलगा योगेश कदम याला राजकारणातून संपण्यासाठी योजना आखली, असा आरोपही कदम यांनी केला. यावेळी भाषणात कदम म्हणाले, “योगेश कदमाला कसं संपवायचं” याचं हे प्लॅनिंग अनिल परबांचं होतं. योगेश कदम आणि रामदास कदम यांना कायमचं राजकारणातून संपवण्यासाठी मातोश्रीत कशा बैठका सुरू असायच्या? हे उदय सामंत आपल्याला सांगितलं. या बैठकीला सुभाष देसाई, विनायक राऊत, अनिल परब, आदित्य ठाकरे आणि उदय सामंत उपस्थित असायचे. हे सगळे मिळून योगेश आणि रामदास कदम यांना संपवण्याचं प्लॅनिंग करायचे,” असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam criticise thackeray group leader used frog name for anil parab rmm