उद्धव ठाकरे हे काल कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राजापूरमध्ये जाऊन रिफायनरी विरोधक आंदोलकांशी चर्चा केली. तसेच महाडमधील सभेत बोलताना भाजपा-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोलही केला. दरम्यान, या कोकण दौऱ्यावरून आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “पंतप्रधान मोदी म्हणजे हिटलर अन् खोमेनीचं मिश्रण, देशाला आता…”; ‘जय बजरंगबली’ विधानावरून संजय राऊतांचं टीकास्र!

काय म्हणाले रामदास कदम?

“उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे. त्यांना थोडी जरी वाटली असती तर ते कातळशिल्प बघायला गेले नसते. ती काही चौपाटी नव्हती. मुख्यमंत्री असताना रिफायनरी प्रकल्पसाठी बारसूचं नाव त्यांनीच सुचवलं होतं. त्या प्रकल्पसाठी केंद्र सरकारला पत्रही त्यांनीच दिलं होतं. मग आता ते कोणत्या तोंडाने कातळशिल्प बघायला जात आहेत?” अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

हेही वाचा – “प्रत्येक निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत भाजपाला…”, उद्धव ठाकरेंचं विधान

“उद्धव ठाकरे सुडाच्या भावनेने पेटलेले आहेत. त्यांना एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद घालवायचं आहे. त्यासाठी ते सातत्याने करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री असताना ते अडीच वर्ष कोंबड्यासारखे मातोश्रीवर बसून होते. तेव्हा ते बाहेर पडले नाहीत. मात्र, आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर कातळशिल्प बघायला जात आहेत”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे का घेतला? त्यांनीच सांगितलं कारण, म्हणाले…

दरम्यान, काल राजपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांना ३३ देशात गद्दार म्हणून ओळखलं जातं, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यालाही रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं. “एकनाथ शिंदे गद्दार नाहीत, खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुळात एकाच वेळी शिवसेनेचे ४० आमदार बंडखोरी करतात, याचाच अर्थ या पक्षाच्या प्रमुख पदावर बसलेला व्यक्ती किती नालायक आहे, हे ३३ देशांना कळलं असेल”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam criticized uddhav thackeray kokan visit and barsu project spb