दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरून सध्या एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष बघायला मिळतो आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची बैठक वांद्रे येथे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दसरा मेळाव्याच्या तयारीसह इतर विषयांबाबत चर्चा केली. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, आता या वादात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उडी घेतली आहे. आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असा विश्वास त्यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.
दसरा मेळाव्यावरून रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “उद्धव ठाकरे हे…”
शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असा विश्वासही रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-09-2022 at 12:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam criticized uddhav thackeray on dasara melava at shivaji park spb