आदित्य ठाकरे यांनाच शंभर खोके घ्यायची सवय असल्याचा आरोप शिंदे गटातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या शंभर खोक्यांची पोलोखोल करणार असल्याचे देखील कदम म्हणाले. आज दापोली इथे शिंदे गटाची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेत आदित्य ठाकरेंच्या शंभर खोक्यांची पोलोखोल करणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. काका म्हणत अडीच वर्ष माझ्याकडून काम समजून घेतलं आणि नंतर काकाच्याच पाठीत खंजीर खुपसला म्हणत कदमांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- “….तर उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा, मी त्यांना सांगेन”; ‘चिता’ प्रकरणावरुन नारायण राणेंचा शिवसेना पक्षप्रमुखांना सल्ला

शिंदे गट विरुद्ध शिवसेना संघर्ष

गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होताना दिसत आहे. दोन्हीकडचे नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आता शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरट टीका केली आहे. शंभर खोके घ्यायची सवय कोणाला आहे, याची पोलखोल आजच्या दापोली येथील शिवसेनेच्या जाहीर सभेत करणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे. यावेळी रामदास कदम यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा ‘चिपळूणचा नाच्या’ असा उल्लेख करत त्यांच्यावरही जोरदार टीका केली.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंच अस्तित्व आहे कुठे? ते फक्त..”; नारायण राणेंची खोचक टीका, म्हणाले सरकार गेलं की…”

आदित्य ठाकरेंसह भास्कर जाधवांची रामदास कदमांवर जोरदार टीका

आदित्य ठाकरे हे रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. तसेच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी देखील रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. रामदास कदम यांचा गद्दार असा उल्लेख केला होता. रामदास कदमांची शिवसेनेतून हाकलपट्टी केली आणि त्यावेळेला ते सातत्याने मीडियाच्या समोर जाऊन डोळ्यामध्ये ग्रीसरीन टाकून ढसाढसा रडण्याचे नाटक करत होते. रामदास कदम यांच्यासारखा खोटा माणूस उभ्या हिंदुस्थानात सापडणार नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली होती.