शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकावर कठोर शब्दांत टीका करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यातील संघर्षही शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांचे भाषण ऐकल्यानंतर महिला त्यांची जोड्याने पूजा करतील. मुंबईतील शौचालयांत जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदम यांच्या तोंडून बाहेर पडली, असे भास्कर जाधव म्हणाले होते. आता भास्कर जाधव यांच्या याच वक्तव्यावर रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे. भास्कर जाधव यांना डॉक्टरांची नितांत गरज आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार केले नाही, तर ते वेडे होऊन दगडही मारू शकतात, असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>>> “…तेव्हा एकनाथ शिंदेंना आपली चूक लक्षात येईल” भाजपाच सरकार पाडेल म्हणत जयंत पाटलांचं मोठं विधान

95 Year Old Voter
95 Year Old Voter : ९५ वर्षांच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले, “लोकशाही बळकट…”
no alt text set
Devendra Fadnavis: “आवाज सुप्रिया सुळेंसारखा, पण…”; फडणवीसांची बिटकॉइन…
Sameer Bhujbal vs Suhas Kande (1)
“आज तुझा मर्डर फिक्स”, सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी; म्हणाले, “त्यांचे गुंड आले मला…”
Devendra Fadnavis on Anil Deshmukh
Devendra Fadnavis : “दगड मागून मारला, तर पुढे कसं लागलं? असा दगड फक्त रजनीकांतच्या…”, अनिल देशमुखांच्या हल्ल्यावर देवेंद्र फडणवीसांचे प्रश्न!
What Ajit Pawar Said?
Sharmila Pawar : बारामतीतल्या मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा शर्मिला पवार यांचा आरोप, अजित पवार म्हणाले,”अरे बाबांनो..”
no alt text set
Maharashtra Assembly Election: कुठे काका-पुतण्या तर कुठे बाप-लेक… विधानसभेच्या ‘या’ १० हाय-प्रोफाईल लढतींवर राज्याचे लक्ष
MP Supriya Sule On Ajit Pawar
Bitcoin Scam: “तो आवाज माझ्या बहिणीचा…”, बिटकॉइन स्कॅमवर अजित पवारांचा धक्कादायक आरोप
eknath shinde raj thackeray (2)
“शिंदेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या नावे खोटा प्रचार, बनावट सहीचं पत्र व्हायरल”, मनसेची पोलिसांत धाव; नेमकी भानगड काय?
Amit thackeray meet Sada sarvankar
Mahim Constituency : सरवणकरांच्या खिशावरील धनुष्यबाण चिन्ह पाहताच अमित ठाकरेंनी केलेली कृती चर्चेत; सिद्धिविनायक मंदिरात आले आमने-सामने!

दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या सभेत भास्कर जाधव यांचं भाषण झाले. त्यांनी या भाषणात अतिशय खालच्या पातळीवर येऊन माझ्यावर टीका केली. भाषण संपल्यानंतर ते मंचावर वेड्यासारखे नाचले होते. शिवसेनेचा नेता केल्यामुळे त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. उद्धव ठाकरेंना खूश करण्यासाठी त्यांचा हा एकमेव कार्यक्रम चालू आहे. मी मासाहेबांचे नाव घेतले होते. आम्हा सर्वांनाच त्या वंदनीय आहेत.त्या स्टेजवर कधीही आल्या नव्हत्या. त्या नेहमी खाली बसलेल्या असायच्या, असं मी म्हणालो होतो. मी चांगलंच बोललो वाईट बोललो नाही, असे रामदास कदम म्हणाले.

हेही वाचा >>>> “मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही तेवढी…”, भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर हल्लाबोल; म्हणाले, “तातडीने वेड्याच्या…”

मात्र भास्कर जाधव उद्धव ठाकरेंना भडकवण्याचं काम करत आहेत. भास्कर जाधव यांचं नारायण राणे, उदय सामंत यांच्याशी कधीही जमलं नाही. आता त्यांनी माझ्याशी पंगा घेतला आहे. भास्कर जाधव यांचे डोके नासले आहे. त्यांना डॉक्टरांची नितांत गरज आहे. त्यांनी वेळीच उपचार केले नाही, तर ते वेडे होऊन दगडही मारू शकतात. मला आव्हान देणारे भले-भले थकले आहेत. माझा मुलगाच त्यांना उत्तर देण्यासाठी पुरेसा आहे, असे म्हणत त्यांनी भास्कर जाधव यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

भास्कर जाधव काय म्हणाले होते?

“रामदास कदम यांनी घेतलेली सभा राजकीय वैचारिकतेला छेद देणारी आहे. त्यांनी वापरलेली भाषा आजतागायत कोणीही वापरली नाही. रामदास कदमांचे भाषण महाराष्ट्रात पाहिल्यानंतर महिला त्यांची जोड्याने पूजा करतील. मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली, असे भास्कर जाधव म्हणाले होते.