दळवी विरोधकाचीच तालुकाप्रमुखपदी नियुक्ती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर पक्षप्रमुखांनी रामदास कदम यांच्या बाजूने कौल देत त्यांच्याच यादीला हिरवा कंदिल दिला. या यादीबरोबरच कदम यांनी तालुकाप्रमुखपदी प्रदीप सुर्वे यांची तडकाफडकी नियुक्ती जाहीर करत पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्यामार्फत एबी फॉर्म देण्याची संधी साधली. या घडामोडीने श्री. दळवी आणि त्यांच्या समर्थकांनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून या परिस्थितीचा फायदा भाजप आणि राष्ट्रवादीला होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

मुळात दापोली आणि मंडणगड तालुक्यातील उमेदवारांची यादी चार दिवसांपूर्वी जाहीर झाल्यानंतर सूर्यकांत दळवी यांच्यासह दोन्ही तालुकाप्रमुख, विभागप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षप्रमुखांकडे पाठवून दिले होते. पहिल्या यादीत गद्दारांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत यादी बदलून देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी रात्री यादीमध्ये दळवी यांना अपेक्षित बदल करण्यात आला. ती यादी दळवी यांनी शनिवारी सकाळी दापोलीत जाहीर केल्यानंतर रामदास कदम यांनी तातडीने मातोश्रीवर जाऊन यादीत पुन्हा एकदा बदल केला आणि संध्याकाळी तीसुधारित यादी म्हणून प्रसारितही केली. त्यातही कदम यांनी विधानसभा निवडणुकीत दळवी यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले प्रदीप सुर्वे यांना तालुकाप्रमुखपद देण्याचा आग्रह कायम ठेवत त्यावर मातोश्री’वरून शिक्कामोर्तबही मिळवले. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी त्यांच्यामार्फतच एबी फॉर्मचे वितरण करण्यात येणार आहे.

या घडामोडीमुळे नाराज झालेल्या दळवी आणि त्यांच्या समर्थकांकडून आगामी निवडणुकीत कदम समर्थकांची कोंडी करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, दापोलीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज शिवसेनेच्या शंकर साळवी, अनंत करबेले आणि प्रदीप राणे, तर पंचायत समितीसाठी राजेंद्र फणसे, वृषाली सुर्वे, मनिषा खेडेकर, दीपक घडशी, संतोष आंबेकर असे एकूण आठ उमेदवारांनी मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज भरले.

दळवी समर्थक गटातील उमेदवारांनी उद्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. दरम्यान, भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी केदार साठे आणि विनायक पास्टे, तर पंचायत समितीसाठी भाऊ इदाते, पांडुरंग पावसे यांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून पंचायत समितीसाठी शंकर मुरमुरे यांचा अर्ज दाखल झाला आहे.

राष्ट्रवादीकडून आतापर्यंत अद्याप एकही अर्ज दाखल झालेली नसून त्यांच्यासह भाजप आणि काँग्रेस उद्याच स्वतचे गुलदस्त्यातील उमेदवार उघड करणार आहेत.