सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी याबाबत वक्तव्येही केली आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत अजित पवारांचा बॅनर लावला असून त्यावर ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या सर घडामोडीनंतर माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी टीकास्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघावीत, स्वप्न बघायला कुणाची काहीही अडचण नाही. शिवसेनेच्या आमदारांना संपवून स्वत: मुख्यमंत्री बनायचं, अजित पवारांचं स्वप्न होतं. त्यासाठी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपये दिले, अशी टीका रामदास कदमांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “….तर मी घरात घुसून मारेन,” अमेय खोपकरांचा शिवसेना नेत्यांना इशारा, पाहा VIDEO

अजित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करणाऱ्या बॅनरबाबत प्रतिक्रिया देताना रामदास कदम म्हणाले, “स्वप्न बघायला कुणाची कसलीही अडचण नाही. त्यांनी स्वप्नामध्ये राहावं. शिवसेनेच्या आमदारांना संपवायचं त्यांचं स्वप्न होतं. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपये दिले. शिवसेनेच्या आमदारांना संपवून त्यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचं होतं.”

हेही वाचा- “आदित्य ठाकरेंवर शेंबडं पोरगही…” आमचं दुर्दैव असल्याचं म्हणत रामदास कदमांची जोरदार टीका!

“पण शिवसेनेच्या ४० आमदारांना वेळीच हे सगळं कळालं. त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंना ही बाब सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना भेटायचा प्रयत्न केला. पण उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत, त्यांचं ऐकूनही घेतलं नाही. त्यामुळेच आपली आमदारकी वाचवण्यासाठी संबंधित आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून कदाचित आज त्यांची आमदारकी वाचेल. नाहीतर सगळे आमदार संपले असते, शिवसेनाही संपली असती. शिवसेनेला संपवून अजित पवार नक्की मुख्यमंत्री झाले असते. पण ४० आमदारांनी योग्य वेळी योग्य पाऊल उचललं” अशी टीका रामदास कदमांनी केली आहे.