Raj Thackeray is like Bal Thackeray for us says Ramdas Kadam : महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्याआधी निर्णयांचा धडाका लावला आहे. महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. यासह इतरही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे (शिंदे) नेते रामदास कदम यांनी राज्य सरकारच्या निर्णयांचं स्वागत केलं आहे. तसेच ते म्हणाले, “महाराष्ट्रात आजवर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. मात्र, या सरकारने सर्वाधिक व लोकाभूमिक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. यांच्या सरकारने गेल्या अडीच वर्षांत २५० हून अधिक लोकाभिमूक निर्णय घेतले आहेत”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा