शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना कोण संजय राऊत? असा प्रतिप्रश्न शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला होता. तसेच शिवसेना आम्ही बनवली तेव्हा संजय राऊत शिवसेनेत नव्हते असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, रामदास कदम यांच्या टीकेला संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विक्रोळीचे आमदार सुनील राऊत म्हणाले, आपल्या सर्वांना माहिती आहे की संजय राऊत हे गेली ३५ वर्ष ‘सामना’ची (शिवसेनेचं मुखपत्र) धुरा सांभाळत आहेत. ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एवढा मोठा पेपर संजय राऊत यांच्या हातात दिला याचा अर्थ संजय राऊत यांच्यावर या दोघांचाही विश्वास होता.

सुनील राऊत म्हणाले, रामदास कदम जे बोलतायत की, संजय राऊतांनी आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की, ते राष्ट्रवादीचे आहेत की, शिवसेनेचे हे त्यांनी सांगावं, त्यावर मी इतकंच म्हणेन की, आधी रामदास भाईंनी आपल्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की, ज्या ज्या वेळी तुम्ही आमच्या घरी आला होता तेव्हा काय चर्चा झाली होती?

आमदार सुनील राऊत म्हणाले, रामदासभाई तुम्ही जेव्हा जेव्हा संजय राऊतांना भेटायला घरी आलात त्या त्या वेळी तुम्ही राष्ट्रवादीत जाण्याच्या गोष्टी केल्यात की नाही. तुम्ही म्हणालात की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं आहे. त्यासाठी शरद पवार साहेबांशी बोलून घ्या, तुम्ही संजय राऊत यांच्याकडे अशी मागणी वारंवार केली. रामदास भाई संजय राऊतांना म्हणाले की, तुम्ही पवार साहेबांशी बोललात तर माझं राष्ट्रवादीत बस्तान बसेल.

हे ही वाचा >> “पंतप्रधान मोदींचं स्वागत करा, परंतु भारतातले मानवाधिकार…”, अमेरिकेतल्या ७५ खासदारांचं जो बायडेन यांना पत्र

सुनील राऊत म्हणाले, रामदास कदमांच्या या मागणीनंतर प्रत्येक वेळी संजय राऊत रामदास कदमांना सांगायचे की, शिवसेना सोडण्यात काही अर्थ नाही. तुम्ही शिवसेनेत राहा तुमचं भविष्य शिवसेनेतच आहे. आज रामदास कदम ज्या निष्ठेच्या गोष्टी करत आहेत त्या संजय राऊतांना रामदास भाईंकडून शिकण्याची गरज नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam wanted to join ncp insist sanjay raut to talk sharad pawar says sunil raut asc
Show comments