Ramesh Bornare Vaijapur Assembly constituency Uddhav Thackeray : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पैसे घेऊन उमेदवारी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेचे (शिंदे गट) वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच वैजापूरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर आणि स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्यावर टीका केली होती. बोरनारे यांनी आज (१८ सप्टेंबर) वैजापुरात सभा घेऊन उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं.

रमेश बोरनारे म्हणाले, “२०१९ च्या निवडणुकीत वैजापूर विधानसभेची उमेदवारी देत असताना पैशाचा वापर होणार होता. पैसे घेऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला गेला. एका माणसाला बळजबरीने पैशांच्या बदल्यात उमेदवारी दिली जाणार होती. उमेदवारी विकण्याचा घाट त्यांनी घातला होता आणि काल ते वैजापूरला येऊन माझ्यावर टीका करून गेले. ते म्हणाले, रमेश बोरनारेला उलटं टांगलं असतं. मात्र मी असं बोललो की आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी तुम्हाला काँग्रेसबरोबर आघाडी करताना पाहिलं असतं तर त्यांनीच तुम्हाला उलटं टांगलं असतं”.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Eknath shinde Sanjay raut
Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप

हे ही वाचा >> “राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाव्यात, पण रश्मी ठाकरेंचं नाव नको”, किशोरी पेडणेकर असं का म्हणाल्या?

“…तर शिवसैनिक आत्महत्या करतील, असं मी त्यांना सांगितलं होतं”

आमदार बोरनारे म्हणाले, “माजी मुख्यमंत्र्यांचा तोल ढासळला आहे. त्यामुळेच एका आमदारावर टीका करू लागले आहेत. ते त्यांना शोभत नाही. आम्हाला वाटलेलं वैजापूरला आल्यावर ठाकरे एखाद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील. पण ते आले आणि टीका करून गेले. मला फक्त एकच सांगायचं आहे की मागील निवडणुकीत मला सहज उमेदवारी मिळाली नाही. ते शेवटच्या क्षणी पैसे देणाऱ्याला तिकीट देणार होते. मात्र मी त्यांना भेटून सांगितलं की गेल्या २५ वर्षांपासून मी शिवसेनेसाठी किती काम केलं आहे. मी त्यांना आजवर केलेल्या कामांची माहिती दिली. मी त्यांना म्हटलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं नाही तर शिवसैनिक आत्महत्या करतील”.

हे ही वाचा >> Maa Amruta : “अमृता फडणवीसांना आजपासून मॅडम नाही, माँ अमृता संबोधणार”, भाजपा आमदाराचं विधान चर्चेत!

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे वैजापूरच्या सभेत म्हणाले होते, “४० आमदारांनी पक्षाशी गदारी करून महाराष्ट्राच्या मातीला गद्दारीचा कलंक लावला. वैजापूरच्या आमदाराने या भूमीलाही कलंक लावला आहे. येत्या निवडणुकीत या गद्दारांनी शिवसेनेच्या मशालीचा सामना करून दाखवावा”.