लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आíथक विकास महामंडळात झालेला घोटाळा ही आपली चूकच असल्याची कबुली या महामंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे वादग्रस्त आमदार रमेश कदम यांनी दिली.
मोहोळ येथे पोलीस ठाण्यावर गेल्या ४ जुलै रोजी आपण काढलेला ‘अटक मोर्चा’ आणि त्या वेळी घडलेल्या िहसक घटनेप्रकरणी पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली आपल्या विरोधात दाखल झालेला गुन्हा अन्यायकारक आहे. त्याबद्दल आपण शासनाच्या विरोधात दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.

कदम यांच्यावर गुन्हा दाखल
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांच्यावर शनिवारी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर कर्जवाटपामध्ये गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी दहिसर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader