Ramraje Naik Nimbalkar Sharad Pawar : फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते व माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर हाती तुतारी (राष्ट्रवाद च्या शरद पवार गटाचं निवडणूक चिन्ह) घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. त्यातच आता रामराजे निंबाळकर यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे फलटणच्या राजकारणात उलथापालक सुरू झाली आहे. रामराजे नाईक निंबाळकरांनी अप्रत्यक्षपणे पक्षाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेकदा माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर व भाजपा नेते जयकुमार गोरे यांच्याविरोधातील नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी या दोन्ही नेत्यांची पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार देखील केली आहे. “वरिष्ठांनी या तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील काळात हाती तुतारी घेऊ”, असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा >> Chandrakant Khaire : “महाराष्ट्रात दंगली का होत नाहीत? झाल्या पाहिजेत”, चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य

रामराजे यांनी काही वेळापूर्वी फलटण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, “तीन महिन्यांपूर्वी तुम्ही तुतारीची चर्चा सुरू केली, मी त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र यांची (रणजीत नाईक निंबाळकर व त्यांचे साथीदार) दहशत रोखली पाहिजे. आपलं भारतीय जनता पार्टीशी कोणत्याही प्रकारचं भांडण नाही. आपण हिंदू-मुस्लिम वाद करत नाही, कोणी गाय मारली तर आपण त्याला संरक्षण देत नाही. आपली तक्रार एकच आहे, रणजीत सिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या साथीदारांनी फलटणमधल्या गल्लोगल्ली जी दहशत निर्माण केली आहे, त्यांचे जे प्रकार चालू आहेत, त्याविरोधात आपण तक्रार केली आहे. त्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी”.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : “…उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसला माफी मागायला लावणार का?” फडणवीसांनी सांगितल्या ७० वर्षांतील तीन घटना

…तर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागतोय, रामराजे नाईक निंबाळकरांचं सूचक वक्तव्य

रामराजे म्हणाले, आमचं एवढंच म्हणणं आहे की रणजीत निंबाळकर व त्यांच्या साथीदारांच्या दहशतीला भारतीय जनता पार्टीने सत्तेतून साथ देऊ नये. आपली एवढीच तक्रार आहे. ही तक्रार आपण वरिष्ठांना सांगून बघू. तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर तयारीने या. महिलांनी देखील यायला हवं. आपण वरिष्ठांशी चर्चा करू. एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि हा विषय संपवून टाकू. आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही, आपल्या तक्रारीमुळे कोणताही फरक पडला नाही तर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागतोय. अजून काही बोलायचं बाकी राहिलं आहे का?